कोपरगाव तालुका
..या पतसंस्थेने वितरित केले कोरोना प्रतिबंधक औषध !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील नागरिकांना कोरोना साथ प्रतिबंध करण्यासाठी ज्योती पतसंस्थेतर्फे सुरु करण्यात आलेल्या होमिओपॅथिक औषध मोहिमेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.आतापर्यंत जवळपास १ हजार कुटूबांपर्यंत ‘ अर्सेनिक अल्बम-३०’हे होमिओपॅथीक औषध दिले गेले आहे.या उपक्रमाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
जगभरात कोरोना साथीचे तांडव सुरु आहे साडेतीन लाख नागरिकांचे बळी या साथीत गेले आहे.हि साथ आटोक्यात आणताना सरकारच्या नाकी नऊ आले आहे.यावर अद्याप रामबाण उपाय निर्माण झालेला नाही या पार्श्वभूमीवर आयुष्य मंत्रालयाने होमिओपॅथी रोग प्रतिकारक शक्तीवर्धक औषध पुढे आणले आहे.या गोड लागणाऱ्या गोळ्यांचा सध्या देशभरात खूप बोलबाला सुरु झाला आहे.या पार्श्वभूमीवर ज्योती पतसंस्थेने या गोळ्या आपल्या शहरातील नागरिकांना वितरित करण्यास प्रारंभ केला आहे.
ज्योती नागरी सहकारी पतसंस्थेने या सर्व कुटूंब प्रमुखांची यादीही बनविण्यात आली आहे.या औषधांच्या परिणामांची माहिती जमा करण्यास सहाययभूत ठरणार आहे.या शिवाय या औषधाच्या उपयोगीतेबद्दल अधिकची माहिती जाणुन घेता येईल. रोज ११ ते ४ या वेळेत हे औषध देणेची व्यवस्था ‘ ज्योती पतसंस्थेच्या ‘ कार्यालयात करण्यात आलेली आहे.या सेवेचा नागरिकांनी लाभ घ्याव व आपले गाव कोरोना पासून मुक्त ठेवण्याच्या आमच्या या प्रयत्नांना सहकार्य करावे असे आवाहन ज्योती अॅड.रवींद्र बोरावके यांनी शेवटी केले आहे.