जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

..त्या नागरिकांची प्रशासनाला खबर द्या-वहाडणे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्यातील मुंबई,पुणे शहरात कोरोना विषाणूची साथ मोठ्या प्रमाणावर पसरत असल्याने या शहरातील नागरीक भीतीपोटी मोठ्या संख्येने ग्रामिण भागात विस्थापित होत आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे.कोपरगाव शहरातील आरोग्य आतापर्यंत आरोग्य,पोलीस विभाग व नागरिकांच्या सहकार्याने राखता आला आहे मात्र आता या रात्री-अपरात्री येणाऱ्या नागरिकांचा धोका वाढला असून या येणाऱ्या नागरिकांची खबर प्रशासनाला प्रत्येकाने देणे क्रमप्राप्त आहे अन्यथा शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते असा इशारा कोपरगाव नगर अपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिला आहे.

भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या २ हजार ०५ ४ ने वाढून ती १ लाख ६७ हजार ४४२ इतकी झाली असून ४ हजार ७९७ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या ५९ हजार ५४६ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने १ हजार ९८२ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या १०२ वर जाऊन पोहचली आहे तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.

मुंबई,ठाणे,पुणे मालेगाव हि कोरोनाची नवी केंद्रे ठरली आहेत.कोपरगाव तालुक्यातही दोन बळी गेले आहे.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील टाळेबंदी तिसऱ्यादा वाढवून ३१ मे पर्यंत केली आहे.आता सरकार उद्योग धंदे अधिक काळ बंद करू शकत नाही असा अंदाज आहे.कोपरगावात १० एप्रिल नंतर दुसरा रुग्ण आढळला नव्हता.आता निघोज नजीक चार रुग्णांची भर पडली असल्याने अधिकच धोका वाढला आहे.एकवीस संशयित नागरिक आरोग्य विभागाने ताब्यात घेतले आहे. नागरिकांत आता या साथीबाबत पुन्हा भय दिसून येत आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी हे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की,”अहमदनगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई इ. शहरी भागातून अनेकजण विनापरवाना खेड्यापाड्यात आले. त्यांच्यातील काहीजण कोरोना बाधित निघाल्याने अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे.
कोपरगाव शहर व तालुक्यात प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व सुदन्य नागरिकांच्या जागरुकतेमुळे आजतरी आपण कोरोनापासून बचावलेलो आहोत. तरी ही कोपरगाव शहर व तालुक्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या शहरातून अनेकांचे कुटुंबिय,नातेवाईक, मित्र विनापरवाना रात्रीअपरात्री येत आहेत.त्यातील अनेकांना शोधून प्रशासनाने देखभालीत (क्वारंटाईन) रवाना केले आहे. काहीजण मात्र संस्थात्मक विलगीकरणात न रहाता प्रशासनाला न कळवता परस्पर घरी जात असल्याने त्या कुटुंबाला व शेजाऱ्यांनाही कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो.त्यामुळे आपल्या गावात,शेजारी किंवा गल्लीत,मोहलल्यात,कॉलनीत बाहेरगावाहून कुणीही आल्यास त्वरीत स्थानिक प्रशासनास कळवावे.कळविणाऱ्या व्यक्तींची नांवे गुप्त ठेवली जाणार आहेत.सर्वांच्याच जीविताच्या हितासाठी आपण जागरूक राहून प्रशासनास सहकार्य केले नाहीतर पुन्हा एकदा कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढून काही बळी जातील व आपण लाल पट्ट्यात गेलो तर व्यवस्थित सुरू झालेले सर्व लहान मोठे व्यवसाय बंद होऊन सर्वांनाच कठोर संचारबंदीला तोंड द्यावे लागणार असल्याचा” इशारा अध्यक्ष वहाडणे यांनी शेवटी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close