नगर जिल्हा
..त्या शिक्षकांना ५० लाखांचे संरक्षण द्या-मागणी
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
गुरुजींची कोरोना संदर्भात शासनाने विविध ठिकाणी नेमणुक करतांना शिक्षकांच्या प्रतिष्ठेचा विचार केलेला दिसत नाही. दारुच्या गुत्त्यासमोर तळीरामांची रांग व्यवस्थित करणेसाठी अनेक शिक्षकांना नेमणुक देणे.रेशन दुकानात दुकानदारावर नजर ठेवणे.जिल्हा व तालुका सिमांवर असलेल्या तपासणी नाक्यावर नेमणूक करणे.वहातुक नियंत्रण करणे व अवैध वाहतुक थांबवणे.विलागीकरण केलेल्या ठिकाणी महिला शिक्षकांना रात्रीचे कर्तव्य देणे. कोरोना बाधित क्षेत्रात बाधीत कुटुंब व ईतर कुटुंबांना घरपोहोच किराणा,भाजीपाला पोहोच करणे.यासह अनेक तर्हेवाईक वाटणारी कामे करण्यासाठी गुरुजी व ताईंची वेळेचे भान न ठेवता नेमणुका केल्या गेल्या आहेत हे धक्कादायक आहे.
नाशिक-नगर तपासणी नाक्यावर पाथरे शिवारात शिक्षकांना ट्रकने उडवले.ते जखमी होऊन दवाखान्यात पडले आहे.त्यांच्या ऊपचाराचा खर्च कोणी करायचा.मार्च २०२० चे पंचवीस टक्के वेतन कपात केले.एप्रील व मे महिन्याच्या पगाराचा पत्ता नाही मग जखमी शिक्षकांच्या ऊपचारासाठी कुटुंबियांनी कुणासमोर हात पसरायचा याचा विचार शासनाने केला पाहीजे.दारुच्या गुत्यासमोर आपले गुरुजी उभे राहुन शिठ्ठी वाजवत आहे हे पालक व विद्यार्थ्यांनी पाहीले तर विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा काय आदर्श घ्यायचा ?
प्राथमिक शिक्षक म्हणजे गुरुजी अथवा गुरु हा शब्द समोर आला म्हणजे एक आदर्शवादी भूमिका वठवणारा माणूस उभा राहतो त्याला ग्रामीण भागात आजही देवत्व बहाल करणारे खूप आहेत.या गुरुजींना गावात मोठी प्रतिष्ठा असते.कोपरगांव तालुक्यातील करंजी नावच्या गांवात तर सेवानिवृत्त झालेल्या “कुंभार गुरुजींचे ” तेथील ग्रामस्थांनी मंदीर बांधलेले आहे.त्यांचे आजही मोठ्या भक्तीभावाने ग्रामस्थ दर्शन घेतात.या शिक्षकांच्या पेशाचे नेमणूक करताना विचार झालेला दिसत नाही हे दुर्दैव आहे.जत तालुक्यात नानासाहेब गोरे नावाच्या शिक्षकाला तपासणी नाक्यावर ट्रकने चिरडले! गतप्राण झालेल्या शिक्षकाचे कुटुंब रस्त्यावर आले.कोविड अंतर्गत कोरोना कर्तव्यावर असलेल्या शिक्षकांना ५० लाख विमा संरक्षण मिळावे यासाठी मंत्रीमहोदयांकडे खेटा घालुन संघटनेचे शिक्षक नेते थकले तरी विमा संरक्षण देण्यास असमर्थता दर्शवित आहे. मग शिक्षकांनी काम कुणाच्या भरवशावर करायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. गुरुजींना अशा नेमणुका देणार्या यंत्रणेने भानावर रहाण्याची व शिक्षकांना त्यांच्या सामाजीक प्रतिष्ठेप्रमाणे काम देण्यांची जबाबदारी ह्या यंत्रणांनी पाळली पाहिजे.ज्या गावात शिक्षणाचे धडे गिरवायचे.तेथील रेशन दुकानदारांवर नजर ठेवायला गुरुजींना सांगुन गावात त्यांचे संबंध बिघडवायचे.या कामी ग्रामसेवक,तलाठी,पोलीस पाटील,सरपंच यांची नेमणुक असणे गरजेचे असतांना बिचारे गुरुजी नाहक भरडले जात आहे.