जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात २० स्वयंचलित हवामान केंन्द्रांची गरज

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात वर्तमान्स स्थितीत पाच हवामान केंद्रे असून ती पुरेशी ठरत नाही त्यामुळे अनेक गावांवर फळपिक योजनांचा लाभ घेताना अन्याय होत आहे.त्यामुळे तालुक्यात अधिकच्या स्वयंचलित हवामान केंद्रांची संख्या वाढवून ती विसवर न्यावी अशी मागणी कोपरगाव तालुक्याचे आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांचेकडे नुकतीच केली आहे.

कोपरगाव मतदार संघात भाऊसाहेब फुंडकर योजनेत पेरू व इतर कलमांची उपलब्धता वाढविण्यात यावी.कोरोनाच्या संकटात टाळेबंदी करण्यात आल्यामुळे काढणीस आलेल्या द्राक्षे व चिकु फळ उत्पादकांना नुकसान भरपाई मिळावी.जलसंधारण योजनेंतर्गत नाला खोलीकरण व गाळ काढणे य कामासाठी शासनाकडून निधी मिळावा.कृषी यांत्रीकीकारण योजनेमध्ये २०१९-२० प्राप्त अर्जाच्या तुलनेत ट्रक्टर व कृषी औजारांचा लक्षांक कमी असून तो सन २०२०-२१ मध्ये वाढवून मिळावा-आ. काळे

राज्याचे कृषीमंत्री ना.दादासाहेब भुसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात नुकतीच सन-२०२० च्या खरीप हंगाम आढावा बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीत आ.काळे यांनी कोपरगाव मतदार संघातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मांडले.भाऊसाहेब फुंडकर योजनेत पेरू व इतर कलमांची उपलब्धता वाढविण्यात यावी.कोरोनाच्या संकटात टाळेबंदी करण्यात आल्यामुळे काढणीस आलेल्या द्राक्षे व चिकु फळ उत्पादकांना नुकसान भरपाई मिळावी.जलसंधारण योजनेंतर्गत नाला खोलीकरण व गाळ काढणे य कामासाठी शासनाकडून निधी मिळावा.कृषी यांत्रीकीकारण योजनेमध्ये २०१९-२० प्राप्त अर्जाच्या तुलनेत ट्रक्टर व कृषी औजारांचा लक्षांक कमी असून तो सन २०२०-२१ मध्ये वाढवून मिळावा.फलोत्पादन विकास योजनेंतर्गत कांदाचाळ,शेततळे अस्तरीकरण २०१९-२० मध्ये प्राप्त अर्जाच्या तुलनेत लक्षांक कमी असून तो सन २०२०-२१ मध्ये वाढवून मिळावा.प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचे सन २०१९-२०चे थकीत असलेले अनुदान शेतकऱ्यांना त्वरित मिळावे व सन २०२०- २१ करीता नवीन अर्ज स्विकारण्याची ऑंनलाइन प्रक्रिया सुरु करावी.मागेल त्याला शेततळे,कांदाचाळ,शेततळे अस्तरीकरण या योजनांचे ऑंनलाईन अर्ज स्वीकारणे सुरु करावे तसेच सन २०१९-२० मध्ये शेततळे,कांदाचाळ व अस्तरीकरण केलेल्या शेतकऱ्यांचे अनुदान शेतकऱ्याना मिळावे.महाबीज मार्फत पुरवठा होणारे बियाणे अनुदानावर उपलब्ध व्हावे.आदी मागण्या आ.काळे यांनी या बैठकीत केल्या असून कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांनी या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचा दावा आ.काळे यांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close