कोपरगाव तालुका
कोपरगावातील पुलाच्या कामाची..या नेत्याकडून पाहाणी
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील गोकुळनगरी येथील पुररेषेतील इंदिरापथ मार्गावरील खंदक नाल्यावरील प्रगती पथावरील पुलाच्या कामाची पाहणी केली आहे. तसेच सदर पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे व कामात गुणवत्ता राखावी अशा सूचना दिल्या आहेत.
पावसाळा अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपल्याने प्रलंबित कामांची पाहणी करण्याचे काम आ.आशुतोष काळे यांनी सुरु केले आहे.गत अडीच महिन्यापासून कोरोना साथीमुळे सर्वच प्रगतीपथावरील कामे शासनाने बंद केली होती.आता कोरोनाची टाळेबंदी शासनाने उठवली आहे.त्याच वेळी पावसाळा जवळ येऊन ठेपला आहे.या पार्श्वभूमीवर त्यांनी हा पाहाणी दौरा केला आहे.
पावसाळा अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपल्याने प्रलंबित कामांची पाहणी करण्याचे काम आ.आशुतोष काळे यांनी सुरु केले आहे.गत अडीच महिन्यापासून कोरोना साथीमुळे सर्वच प्रगतीपथावरील कामे शासनाने बंद केली होती.आता कोरोनाची टाळेबंदी शासनाने उठवली आहे.त्याच वेळी पावसाळा जवळ येऊन ठेपला आहे.या पार्श्वभूमीवर त्यांनी हा पाहाणी दौरा केला आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,नगरसेवक वीरेन बोरावके,मंदार पहाडे,संदीप पगारे,हिरामण गंगूले,सुनील शिलेदार,अजीज शेख, राजेंद्र वाकचौरे,मेहमूद सय्यद,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी,राजेंद्र आभाळे,मुकुंद इंगळे,संदीप कपिले,हारूण शेख आदी मान्यवर सुरक्षित अंतर राखून उपस्थित होते.