कोपरगाव तालुका
कोपरगावात कोरोनातील गाळे भाडे माफ करा-मागणी
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात व तालुक्यात कोरोनामुळे शासनाने टाळेबंदी जाहीर केल्याने दुकाने तब्बल दोन महिने बंद ठेवावी लागल्याने व्यावसायिकांचे कंबरडे मोडलेले आहे.त्यांना आपला उदरनिर्वाह करणे अवघड बनले आहे या पार्श्वभूमीवर कोपरगाव नगरपरिषदेने या कालखंडातील गाळ्यांचे भाडे व शहरातील नागरिकांची पाणीपट्टी माफ करावी अशी मागणी कोपरगाव येथील जेष्ठ कार्यकर्ते उमेश धुमाळ यांचेसह व्यापाऱ्यांनी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचेकडे एका निवेदनाद्वारे नुकतीच केली आहे.
कोपरगाव शहरात कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून शासन आदेशाप्रमाणे कोपरगाव पालिकेने कोपरगाव शहरात सम्पूर्ण टाळेबंदी जाहीर केली होती.त्यामुळे सर्व व्यापाऱ्यांना आपली संस्थाने तथा दुकाने पूर्ण बंद करून आपल्या घरात नजर कैदेत थांबावे लागले.स्वाभाविकपणे दुकानदार व व्यापारी यांची दुकाने बंद राहिल्याने त्यांना उत्पन्नाचा वर्ग राहिला नाही.मात्र खर्च तर दैनंदिन थांबला नाही.परिणामी हातातोंडाची गाठ पडणे दुर्मिळ बनले.त्यामुळे नागरिक व व्यापारी हैराण झाले आहे.त्यामुळे कोपरगाव पालिकेने या व्यापाऱ्यांचे गाळा भाडे व पाणी पट्टी माफ केली तर काही अंशी त्यांना दिलासा मिळेल-उमेश धुमाळ
भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या १ हजार ५४८ ने वाढून ती १ लाख ४६ हजार ४९८ इतकी झाली असून ४१८८ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या ५२ हजार ६६७ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने १ हजार ६९५ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या ७७ वर जाऊन पोहचली आहे तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.मुंबई,ठाणे,पुणे मालेगाव व येवला हि कोरोनाची नवी केंद्रे ठरली आहेत.कोपरगाव तालुक्यातही दोन बळी गेले आहे.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील टाळेबंदी चौथ्यांदा वाढवून ३१ मे पर्यंत केली आहे.या दरम्यान कोपरगाव शहरात कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून शासन आदेशाप्रमाणे कोपरगाव पालिकेने कोपरगाव शहरात सम्पूर्ण टाळेबंदी जाहीर केली होती.त्यामुळे सर्व व्यापाऱ्यांना आपली संस्थाने तथा दुकाने पूर्ण बंद करून आपल्या घरात नजर कैदेत थांबावे लागले.स्वाभाविकपणे दुकानदार व व्यापारी यांची दुकाने बंद राहिल्याने त्यांना उत्पन्नाचा वर्ग राहिला नाही.मात्र खर्च तर दैनंदिन थांबला नाही.परिणामी हातातोंडाची गाठ पडणे दुर्मिळ बनले.त्यामुळे नागरिक व व्यापारी हैराण झाले आहे.त्यामुळे कोपरगाव पालिकेने या व्यापाऱ्यांचे गाळा भाडे व पाणी पट्टी माफ केली तर काही अंशी त्यांना दिलासा मिळेल असेही उमेश धुमाळ यांनी शेवटी म्हटले आहे.निवेदनावर बाळासाहेब देवकर,दीपक हिंगमिरे,केदार वाणी,शामराव लकारे,बाबासाहेब चौधरी, जावेद शेख,संतोष सुपेकर,वैष्णव रामदास,झाकीर शेख आदींच्या सह्या आहेत.