जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

लग्नासाठी खोटी माहिती,लग्न ठरले विघ्न, तेरा जण अटकेत

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

लग्नासाठी कोपरगाव येथील वर असल्याचे सांगून कोपरगाव येथील तहसीलदार यांचेकडून परवानगी मिळवून प्रत्यक्षात नवरदेव माटुंगा,मुंबई येथील असल्याची गुप्त खबर तहसीलदार यांना मिळाल्याने मुर्शतपूर येथील कामगार तलाठी धंनजय गुलाबराव पऱ्हाड (वय-३३) यांनी मुर्शतपुर येथील आरोपी उत्तम नाबाजी पवार राजू नारायण सरोदे यांचेसह तेरा जणांविरुद्ध आज गुन्हा दाखल केल्याने मुर्शतपुर परिसरात खळबळ उडाली आहे.

शासनाने विवाहासाठी फक्त पन्नास नातेवाईकांनाचा परवानगी दिली आहे.शिवाय लग्न विधी परिहार्य असल्याने लग्नासाठी काही नियम व अटी लावून शासनाने परवानगी दिली आहे.त्यात लग्नासाठी आधी तालुक्याचे तहसीलदार यांची परवानगी परिहार्य करण्यात आली आहे.ती खरी माहिती देऊन परवानगी मिळवावी असे स्पष्ट संकेत दिलेले असताना कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपुर येथील वधु पित्याने मात्र वर हा कोपरगाव येथील असल्याची खोटी माहिती देऊन आपल्या मुलीचा लग्न विधी हा लेबर ई वार्ड माटुंगा मुंबई-१९ येथील युवक आकाश राजू सरोदे यांचेशी लावण्यात येत आहे.अशी माहिती कोपरगाव येथील तहसीलदार योगेश चंद्रे याना गुप्त माहितीदारा मार्फत मिळाली होती.

भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या १ हजार ५४८ ने वाढून ती १ लाख ४६ हजार ४९८ इतकी झाली असून ४१८८ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या ५२ हजार ६६७ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने १ हजार ६९५ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या ७७ वर जाऊन पोहचली आहे तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.मुंबई,ठाणे,पुणे मालेगाव व येवला हि कोरोनाची नवी केंद्रे ठरली आहेत.कोपरगाव तालुक्यातही दोन बळी गेले आहे.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.त्यामुळे सरकार सतर्क झाले आहे.या प्राप्त परिस्थितीत शारीरिक सुरक्षा राखणे हि बाब अत्यंत महत्वाची बनली आहे.त्यातच कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून सरकारने कडक नियम बनवले आहे.तोंडाला मुखपट्टी बांधणे गरजेचे आहे.विनापरवाना जिल्हा हद्द ओलांडता येत नाही,विवाहासाठी फक्त पन्नास नातेवाईकांनाचा परवानगी दिली आहे.शिवाय लग्न विधी परिहार्य असल्याने लग्नासाठी काही नियंव अटी लावून शासनाने परवानगी दिली आहे.त्यात लग्नासाठी आधी तालुक्याचे तहसीलदार यांची परवानगी परिहार्य करण्यात आली आहे.ती खरी माहिती देऊन परवानगी मिळवावी असे स्पष्ट संकेत दिलेले असताना कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपुर येथील वधु पित्याने मात्र वर हा कोपरगाव येथील असल्याची खोटी माहिती देऊन आपल्या मुलीचा लग्न विधी हा लेबर ई वार्ड माटुंगा मुंबई-१९ येथील युवक आकाश राजू सरोदे यांचेशी लावण्यात येत आहे.अशी माहिती कोपरगाव येथील तहसीलदार योगेश चंद्रे याना गुप्त माहितीदारा मार्फत मिळाली होती.

त्यामुळे या बातमीची खातरजमा करण्यासाठी त्यांनी तेथील कामगार तलाठी धनंजय पऱ्हाड,पोलीस पाटील गोरख मारुती दवंगे,ग्रामसेवक सुनील राजपूत,व गावातील इसम अनिल दवंगे हे समक्ष घटनास्थळी गेला असता त्यांनी त्या ठिकाणी चौकशी केली असता मिळालेली माहिती खरी निघाली असून वर हा वरील माटुंगा,मुंबई या ठिकाणचा असल्याचे निष्पन्न झाल्याने कामगार तलाठी यांनी या प्रकरणी आरोपी उत्तम नबाजी भालेराव,राजू नारायण सरोदे,अलका राजू सरोदे,अमृत रवींद्र सरोदे, रमेश गोडू धायेकर सर्व रा.माटुंगा मुंबई,रंजना विजय गायकवाड,शीतल विजय गायकवाड,शीतल विजय गायकवाड,सागर विजय गायकवाड,रा.अक्षता केने चाळ मिलिंद नगर कल्याण,पश्चिम.आकाश राजू सरोदे,शुभम उत्तम भालेराव, संगीता उत्तम भालेराव, आश्लेषा उत्तम भालेराव, प्रेरणा उत्तम भालेराव सर्व रा.मुर्शतपूर,ता.कोपरगाव यांचे विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गु.र.न.१८७/२०२० भा.द.वि.कलम ४१८,१८८(२),२६९.२७१,मु.प्रो.का.३७(१),(३)प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांचे मार्गदर्शनाखाली साहायक फौजदार एस.जी.ससाणे हे करीत आहेत.या गुन्ह्यात वापरलेली मारुती एर्टीगा ( क्रं. एम.एच.०५ डी. एस.१३०७) हि जप्त करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close