जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

भाजीपाला आंदोलकात समन्वय,दोन दिवस दिले बदलून

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषदेने भाजी विक्रेत्यांना भाजी विक्रीसाठी जागा ठरवून दिल्या होत्या मात्र भाजी विक्रेत्यांचा पूर्वीच्या जागेवर भाजी विक्री करण्याचा अट्टाहास सुरु होता. यावरून प्रशासन व भाजी विक्रेते यांच्यामध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीतून योग्य मार्ग काढण्यासाठी प्रशासन व भाजी विक्रेते यांच्यामध्ये आ. आशुतोष काळे यांनी समन्वय घडवत तोडगा काढला आहे.

प्रशासन व भाजीपाला विक्रेत्यांचे प्रतिनिधी यांचे म्हणणे ऐकून घेत आ.काळे यांनी सुवर्णमध्य काढून आठवड्यातील मंगळवार आणि शुक्रवार ऐवजी गुरुवार व रविवार हे दोन दिवस नेहरू भाजी मार्केट बंद ठेऊन कोपरगाव शहरातील सर्व भाजीपाला विक्रेत्यांना नवीन बाजार ओटे व इतर व्यवसायीकांसाठी श्री.लक्ष्मीआई मंदिर परिसरात जागा उपलब्ध करून देण्याचा सूचना दिल्या.

देशभरात व राज्यात गेले दोन महिने टाळेबंदी असल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्वच दुकाने बंद होती. कोरोना संकटामुळे करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने शहरातील भाजी मार्केट बंद केले आहे. तेव्हापासून भाजीपाला विक्रेते या बंद दुकानासमोर बसून आपला व्यवसाय करीत होते मात्र टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्यात प्रशासनाच्या वतीने थोडीशी शिथिलता दिल्यामुळे कोपरगाव शहरात मोजकी दुकाने वगळता प्रशासनाने अटी शर्तीवर जवळपास सर्वच दुकानांना व्यवसाय करण्यास परवानगी दिलेली आहे.त्यामुळे या भाजीपाला विक्रेत्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांच्या आधारावर जागेचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत भाजीपाला विक्रेत्या व्यावसायिकांनी आपली कैफियत आ. आशुतोष काळे यांच्याकडे मांडली होती. याबाबत आ. आशुतोष काळे यांनी तहसीलदार योगेश चंद्रे,कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर,नगराध्यक्ष विजय वहाडणे व भाजीपाला विक्रेत्यांचे प्रतिनिधी यांच्यासमवेत तहसील कार्यालयात बैठक घेतली. प्रशासन व भाजीपाला विक्रेत्यांचे प्रतिनिधी यांचे म्हणणे ऐकून घेत आ.काळे यांनी सुवर्णमध्य काढून आठवड्यातील मंगळवार आणि शुक्रवार ऐवजी गुरुवार व रविवार हे दोन दिवस नेहरू भाजी मार्केट बंद ठेऊन कोपरगाव शहरातील सर्व भाजीपाला विक्रेत्यांना नवीन बाजार ओटे व इतर व्यवसायीकांसाठी श्री.लक्ष्मीआई मंदिर परिसरात जागा उपलब्ध करून देण्याचा सूचना दिल्या. व या दोन दिवस एकाच ठिकाणी भाजी विक्रेत्यांनी व इतर छोट्या व्यावसायिकांनी आपला माल विक्री करावा. याबाबत प्रशासन व भाजीपाला विक्रेत्यांचे प्रतिनिधी यांच्यामध्ये एकमत होवून हा प्रश्न मार्गी लागला आहे.


यावेळी बोलतांना आ. आशुतोष काळे म्हणाले की, नेहरू भाजी मार्केटमध्ये परवानाधारक भाजी विक्रेते यांच्या व्यतिरिक्त तालुक्यातील गावोगावी आठवडे बाजारात भाजीपाला व किरकोळ वस्तूंची व्रिक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना तालुक्यातील गावोगावी नियमितपणे भरत असलेले साप्ताहिक आठवडे बाजार बंद असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आजच्या परिस्थितीत अहमदनगर जिल्ह्यातील मोजक्याच तालुक्यांची कोरोनाच्या बाबतीत परिस्थिती समाधानकारक असून यामध्ये आपला कोपरगाव तालुका आहे. कोपरगावच्या नागरीकांचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी प्रशासनाच्या वतीने केलेल्या उपाय योजना प्रभावी ठरल्या आहेत. हि परिस्थिती भविष्यातही अशीच राहण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे यापुढेही काटेकोरपणे पालन करणे हे संपूर्ण कोपरगावच्या जनतेच्या दृष्टीने हिताचे आहे त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,शहराध्यक्ष सुनील गंगुले, सर्व पक्षीय नगरसेवक व भाजीपाला विक्रेत्यांचे प्रतिनिधी या बैठकीसाठी सुरक्षित अंतर पाळुन उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close