कोपरगाव तालुका
कोरोना संशयित महिलेचा मृत्यू,कोपरगाव तालुक्यात खळबळ
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात आज कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीतील मनाई वस्ती येथील २२ वर्षीय महिलेचा संशयित कोरोना आजाराने मृत्यू झाला आहे.दरम्यान या महिलेवर क्षयरोगाचे उपचार सुरु होते.या महिलेचा स्त्राव कोरोना तपासणीसाठी अहमदनगर येथे पाठविण्यात आला आहे.या घटनेने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
कोपरगाव तालुक्यातही या आधीच कोरोनाचे दोन बळी गेले आहे.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील टाळेबंदी तिसऱ्यांदा वाढवून ३१ मे पर्यंत केली आहे.कोपरगावात १० एप्रिल नंतर दुसरा रुग्ण आढळला नव्हता.आता या संशयित रुग्णाची भर पडल्याने नागरिकांत आता या साथीबाबत पुन्हा भय दिसून येत आहे.
भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या १ हजार ३०६ ने वाढून ती १ लाख १९ हजार ५३२ इतकी झाली असून ३६०० जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या ४१ हजार ६४२ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने १४५४ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या ६६ वर जाऊन पोहचली आहे तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.मुंबई,ठाणे,पुणे मालेगाव व येवला हि कोरोनाची नवी केंद्रे ठरली आहेत.कोपरगाव तालुक्यातही या आधीच कोरोनाचे दोन बळी गेले आहे.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील टाळेबंदी तिसऱ्यांदा वाढवून ३१ मे पर्यंत केली आहे.कोपरगावात १० एप्रिल नंतर दुसरा रुग्ण आढळला नव्हता.आता या संशयित रुग्णाची भर पडल्याने नागरिकांत आता या साथीबाबत पुन्हा भय दिसून येत आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुका आरोग्य विभागाने हा भाग पूर्ण बंद केला आहे.
दरम्यान या रुग्णांचा अहवाल प्राप्त होईपर्यंत सदर वस्ती पूर्णतया बंद करण्यात आली आहे. या वस्तीची अंदाजे लोकसंख्या ५०० आहे. सदर महिलेचे घरातील व्यक्तींना आणि निकट संपर्कातील व्यक्तींना घरातच बंदिस्त करण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे. संशयित कोरोना आणि सारी सदृश्य एकच असल्याचेही ते शेवटी म्हणाले आहे.या पूर्वी शिंगणापूर ग्रामपंचायत हद्दीत एक सारी रुग्णांचा मृत्यू तर कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर या उपनगरात एक महिलेचा मृत्यू झालेला आहे.अहवाल जर सकारात्मक आला तर कोपरगाव तालुक्यातील सारीचा मृत्यू हा दुसरा ठरणार आहे.आजच कोपरगाव शहर तब्बल दोन महिन्यानंतर आजच सुरु झाल्यानंतर पहिल्याच दिवशी हा दणका बसल्याने व्यापारी,नागरिक पुन्हा गडबडून गेले आहे.आता नागिकांचे या रुग्णाच्या उद्या येणाऱ्या अहवालाकडे लक्ष लागून आहे.