जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

टाकळीत अंत्यविधिस नकार,येसगावातही तक्रार !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोरोना विषाणूने नागरिकांच्या मनात मोठी भीती निर्माण केल्याने आता अनेक गावात कोरोना नागरिकाखेरीज सामान्य नागरिकांच्या अंत्यविधिसही विरोध होऊ लागला असून त्याचे दुर्मिळ उदाहरण कोपरगाव तालुक्यातील टाकळी व येसगाव ग्रामपंचयात हद्दीत घडल्याने खळबळ उडाली आहे.

राज्यात संचारबंदी, जमावबंदी कलम १४४ हा लागू असतानां येसगावातील ग्रामसेवक,सरपंच,पोलीस पाटील, व त्यांचे गावातील इतर साथीदार मिळून परगावातील अज्ञात व्यक्तीचे प्रेत आमच्या गावातील मुस्लिम स्मशान भूमीत दफन करण्यात आले त्यावेळी त्याठिकाणी एम.एच.४०,एम.एच.४१ आणि काही वेगवेगळ्या ठिकाणच्या पासिंग असणाऱ्या वाहनातून जवळपास शंभर ते सव्वाशे लोक बेकायदा या विधिस हजर होते.हि अत्यंत गंभीर बाब आहे.कुठल्याही प्रकारची परवानगी नसताना हा अंत्यविधी करणे हि बाब ग्रामस्थांच्या जीविताशी खेळण्यासारखीच आहे-प्रभाकर गायकवाड

भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या १ हजार २९३ ने वाढून ती १ लाख १३ हजार ३२१ इतकी झाली असून ३४५६ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या ३९ हजार २९७ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने १३९० जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या ६४ वर जाऊन पोहचली आहे तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.मुंबई,ठाणे,पुणे मालेगाव व येवला हि कोरोनाची नवी केंद्रे ठरली आहेत.कोपरगाव तालुक्यातही दोन बळी गेले आहे.या रुग्णाच्या अंत्यविधिस घरच्या नागरिकांना उपस्थित राहाता आले नव्हते.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील टाळेबंदी तिसऱ्यांदा वाढवून ३१ मे पर्यंत केली आहे.नागरिकांत अद्यापही या साथीच्या प्रसाराची भीती वाटत असल्याने अनेक ठिकाणी विरोध होऊ लागला आहे. व रुग्णाबांबत भय दिसून येत आहे.या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणू ग्रस्त रुग्णांचा अंत्यविधी करणे हि बाब जोखमीची बनली आहे.या अंत्यविधिस आप्तांनाही परवानगी दिली जात नाही.कोपरगाव तालुक्यात अशा कोरोनाग्रस्त रुग्णांचा अंत्यविधिस आता विरोध होऊ लागला आहे.

दरम्यान या बाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांचेशी संपर्क साधला असता त्यांना या बाबत कुठलीही कल्पना नसल्याचे आढळून आले आहे.

कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथील रहिवाशी असलेला अल्पसंख्याक नागरिकांचा अन्य आजाराने काल सकाळी निधन झाले.त्यास कोरोना नसल्याने त्यांच्या पारंपरिक प्रथेप्रणाने दफन विधी होणे अपेक्षित होते.मात्र त्यांच्या समाजासाठी त्या गावात दफन भूमीच नसल्याने तेथील ग्रामस्थानीं त्याला हरकत घेतली मात्र या मृत व्यक्तीचा एक मुलगा येसगाव येथे राहत असल्याने व तेथील एका राजकीय नेत्याने या समाजाला दफनभूमीला जागा देतो असे या पूर्वी आश्वासन दिले असल्याने त्यांनी अखेर येसगावात दुपारी साडे तीनच्या सुमारास हा दफन विधी करण्यात आला आहे.मात्र या बाबत येथील माहिती अधिकार कार्यकर्ता प्रभाकर गायकवाड यांनी त्याला जोरदार हरकत घेत त्याची तक्रार थेट पंतप्रधान कार्यालयापर्यंत केली आहे.व जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या बेजबाबदार पणाकडे लक्ष वेधून घेतले आहे.आता तालुका प्रशासन काय भूमिका घेते या कडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close