जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्यातील प्रश्न अद्याप प्रलंबित,प्रशासनास सकारात्मक विचाराची गरज-आवाहन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील अद्याप सर्व प्रश्न सुटले नसून अनेक प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत हे प्रश्न पुढील जनता दरबारात येणार नाही याची काळजी सबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी अन्यथा अशा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी लागेल असा इशारा आ.आशुतोष काळें यांनी नुकताच एका बैठकीत दिला आहे.

“प्रश्न घेवून येणाऱ्या नागरिकांचे समाधान होण्यासाठी अधिकाऱ्यांनी नागरिकांना सकारात्मक उत्तरे द्यावीत.यापूर्वी घेतलेल्या जनता दरबारात व आजच्या दरबारात बरेच प्रश्न सुटलेले नाहीत.याचा अर्थ अधिकारी योग्य पद्धतीने काम करीत नाही असे दिसून येत आहे”-आ.आशुतोष काळे,अध्यक्ष,साईबाबा संस्थान शिर्डी.

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील नागरिकांच्या विविध शासकीय कार्यालयातील अडलेली कामे तातडीने मार्गी लागावे यासाठी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी नुकताच कोपरगाव तहसील कार्यालयांत नुकताच जनता दरबार घेतला त्यावेळी हा इशारा दिला आहे.

सदर प्रसंगी महसूल विभाग,नगरपालिका,पंचायत समिती,सार्वजनिक बांधकाम विभाग,भूमी अभिलेख,पाटबंधारे विभाग,कृषी विभाग,ग्रामीण रुग्णालय,रेल्वे विभाग,सहाय्यक निबंधक विभाग,दुय्यम निबंधक विभाग,वन विभाग,कोपरगाव शहर व ग्रामीण पोलीस स्टेशन,सामाजिक वनीकरण,वखार महामंडळ आदी विभागाचे अधिकारी यांचेसह कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम,संचालक ज्ञानदेव मांजरे,कारभारी आगवण,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी,शहराध्यक्ष सुनील गंगूले,माजी नगरसेवक मेहमूद सय्यद,राजेंद्र वाकचौरे,अजीज शेख,युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी,रमेश गवळी,सामाजिक कार्यकर्ते संजय काळे,राजेंद्र खिलारी,राजेंद्र आभाळे,नायब तहसीलदार श्रीमती कुलकर्णी,श्रीमती गोरे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,कोपरगाव नगरपरिषेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी,कोपरगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,वीज वितरण कंपनीचे उपकार्यकरी अभियंता भगवंत खराटे आदींसह शासकीय अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान यावेळी अनेक विशिष्ठ कार्यकर्त्यांनी वारंवार प्रश्न मांडून अनेकांचा वेळ बरबाद केला असून अनेक नागरिकांना आपले प्रश्न मांडता आले नाही अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहे.यावर उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,”शासकीय अधिकारी व नागरिकांना एकाच व्यासपीठावर आणून जनता दरबार घेत आहेत.या जनता दरबारात नागरिकांना आपल्या अडचणी मांडता येत आहेत.त्या प्रश्नांवर या जनतां दरबारात मार्ग निघून आजवर अनेक नागरिकांचे प्रश्न मार्गी लागत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की,”प्रश्न घेवून येणाऱ्या नागरिकांचे समाधान होण्यासाठी अधिकाऱ्यांनी नागरिकांना सकारात्मक उत्तरे द्यावीत.यापूर्वी घेतलेल्या जनता दरबारात व आजच्या दरबारात बरेच प्रश्न सुटलेले नाहीत.याचा अर्थ अधिकारी योग्य पद्धतीने काम करीत नाही असे दिसून येत आहे.त्यामुळे त्यासाठी अधिकाऱ्यांनी यापुढील काळात नागरिकांच्या तक्रारी येणार नाही याची काळजी घेवून पुढील जनता दरबारात नागरिकांचे प्रश्न शिल्लक राहणार नाहीत अशा प्रकारे काम करावे जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे खडेबोल सुनावत सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांचे कान टोचले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close