जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

..या गावात किराणा दुकान फोडून ६५ हजारांचा ऐवज लंपास

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील संजीवनी सहकारी साखर कारखाण्या नजीक असलेल्या शिंगणापूर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या कोपरगाव वैजापूर रस्त्यालगत असलेल्या लोणारी कॉमम्प्लेक्स मधील आपल्या मालकीचे किराणा दुकानाचे अज्ञात चोरट्याने शटर उचकटून फोडले असून त्यातील गल्ल्यातील ५९ हजारांचा किराणा माल व एक भ्रमणध्वनी असा ६५ हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केण्याची फिर्याद दुकान मालक साहेबराव शिवाजी झाडगे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.त्यामुळें शिंगणापूर हद्दीत खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार आपण घटनास्थळी गेलो असता दुकानाच्या बाहेर गल्ल्याचे ड्रॉवर बाहेर पडलेले होते.आम्ही मग दुकानात गेलो असता दुकानातील तेलाचे नऊ डबे,डाळ,काजू बदाम,खोबरे,मूग,डाळ दोन कट्टे,मठ डाळ एक कट्टा,तूर डाळ.शेंगदाणे,चना डाळ,गूळ मसाल्याच्या पुड्या असा ५९ हजारांचा किराणा मालाचा ऐवज व एक ६ हजार रुपये किंमतीचा एम.आय.कंपनीचा एक भ्रमणध्वनी त्यात एक व्होडाफोन व एक जिओ कंपनीचे कार्ड असा एकूण ६५ हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याचे आढळून आले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यात शिंगणापूर ग्रामपंचायत हद्दीत कोपरगाव-वैजापूर रस्त्यालगत लोणारी कॉम्प्लेक्स असून त्यात आपल्या मालकीचे किराणा दुकान फिर्यादी साहेबराव झोडगे व त्यांची पत्नी हे चालवतात.सध्या कोरोनाची टाळेबंदी सुरु असुन दुकाने विशिष्ट वेळेत चालू ठेवण्याचे तालुका प्रशासनाचे आदेश आहे.त्या प्रमाणे आपण आपले दुकान दि.१३ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास बंद केले.व आपण शटर बंद करून त्याला कुलूप लावले व आपल्या घरी गेलो असता.रात्रीच्या सुमारास आपल्याला आपल्या भाऊ बाबाजी शिवाजी झोडगे यांचा १४ मेच्या पहाटे २.१५ वाजेच्या सुमारास दूरध्वनी आला. त्याने सांगितले की तुझ्या दुकानाचे शटर वर उचललेले आहे.आपण लगेच घरून घटनास्थळी आलो असता तेथे तशीच स्थिती आढळून आली. दरम्यान तेथे सात-आठ जण जमलेले होते.आपण या घटनेची खबर तातडीने शिंगणापूरच्या पोलीस पाटील प्रशांत आढाव यांना दिली.त्यांनी हि खबर तातडीने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यास दिली.दरम्यान पहाटे ३ च्या सुमारास तेथे पोलीस गाडी आली.दुकानाच्या बाहेर गल्ल्याचे ड्रॉवर बाहेर पडलेले होते.आम्ही मग दुकानात गेलो असता दुकानातील तेलाचे नऊ डबे,डाळ,काजू बदाम,खोबरे,मूग,डाळ दोन कट्टे,मठ डाळ एक कट्टा,तूर डाळ.शेंगदाणे,चना डाळ,गूळ मसाल्याच्या पुड्या असा ५९ हजारांचा किराणा मालाचा ऐवज व एक ६ हजार रुपये किंमतीचा एम.आय.कंपनीचा एक भ्रमणध्वनी त्यात एक व्होडाफोन व एक जिओ कंपनीचे कार्ड असा एकूण ६५ हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याचे आढळून आले आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसानी अज्ञात चोरट्याविरुद्ध गु.र.नं.१६७/२०२० भा.द.वि.कलम ३८०,४५७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.ए. व्ही.गवसने हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close