कोपरगाव तालुका
जमीन वाटपावरून एकाची आत्महत्या,चौघांवर गुन्हा दाखल
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील करंजी ग्रामपंचायत हद्दीत आजे सासरे यांच्या नावावर असलेली शेतजमीन आरोपी मच्छीन्द्र निवृत्ती जाधव,महेश मछिंद्र जाधव,उमेश मच्छीन्द्र जाधव,शैलेश मच्छीन्द्र जाधव शेतजमीन वाटप करून देत नसल्याच्या कारणावरून आपले आपले पती आसाराम ज्ञानदेव जाधव (वय-३८) यांनी वैतागून आत्महत्या केली असल्याची फिर्याद मयताची पत्नी योगिता आसाराम जाधव (वय-३७) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने करंजी परिसरात खळबळ उडाली आहे.
मयत आसाराम जाधव यांनी अनेकवेळा आरोपी व त्यांचे भाऊबंद यांचेकडे या जमिनीबाबत वारंवार मागणी करूनही ते ती जमीन नावावर करुण देत नाही.शिवाय जमिनीचे वाटप करून मागितले तर वरील आरोपी हे कोणत्या ना कोणत्या कारणामूळे ती वाटप करण्यास टाळाटाळ करत होते.व मयताशी भांडण करत होते.त्यांच्या या सततच्या भांडणाला वैतागून अखेर आपल्या पतीने गुरुवार दि.१४ मे रोजी सायंकाळी ७ ते १५ मे रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान संतोष भास्कर जाधव यांचे वस्ती जवळच्या झाडाला दोर लावून गळफास घेतला आहे.
कोपरगाव तालुक्यातील करंजी ग्रामपंचायत हद्दीत फिर्यादी महिलेचे आजे सासरे निवृत्ती नामदेव जाधव यांचे नावावर करंजी,आंचलगाव,बोलकी शिवारात सोळा एकर जमीन आहे.मात्र ती आज तिसरी पिढी कार्यरत असताना अद्याप वाटप झालेले नाही या मुळे या दोन्ही कुटुंबात वाद निर्माण झाला आहे.मयत आसाराम जाधव यांनी अनेकवेळा आरोपी व त्यांचे भाऊबंद यांचेकडे या जमिनीबाबत वारंवार मागणी करूनही ते ती जमीन नावावर करुण देत नाही.शिवाय जमिनीचे वाटप करून मागितले तर वरील आरोपी हे कोणत्या ना कोणत्या कारणामूळे ती वाटप करण्यास टाळाटाळ करत होते.व मयताशी भांडण करत होते.त्यांच्या या सततच्या भांडणाला वैतागून अखेर आपल्या पतीने गुरुवार दि.१४ मे रोजी सायंकाळी ७ ते १५ मे रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान संतोष भास्कर जाधव यांचे वस्ती जवळच्या झाडाला दोर लावून गळफास घेतला आहे.वरील चार आरोपीनी मयतास गळफास घेण्यास प्रवृत्त केले आहे.अशी फिर्याद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी महिला व मयताची पत्नी योगिता जाधव यांनी दाखल केली आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीसांनी या प्रकरणी गु.र.नं.१२६/२०२० भा.द.वि.कलम ३०६ अन्वये वरील चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे हे करीत आहेत.