जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

उर्वरित व्यवसायही सुरु करण्याची परवानगी द्या-नगराध्यक्ष वहाडणे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर व तालुक्यात कोरोनाचा रुग्ण आढळून आता जवळपास महिना उलटून गेला आहे.नवीन रुग्ण किंवा तसा संशयित आढळलेला नाही त्या मुळे जिल्हा प्रशासनाने आता उर्वरित व्यवसायांना सकाळी सात ते दुपारी तीन या वेळेत सुरु करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी नुकतीच केली आहे.

कोपरगावात मात्र १० एप्रिल रोजी लक्ष्मीनगर येथे एक जेष्ठ महिलेचा या साथीत बळी गेला आहे.त्या नंतर शिंगणापूर येथे सारी रुग्णाने दुसरा बळी गेला त्याला आता महिना उलटून गेला आहे.मात्र नवीन रुग्ण आढळलेला नाही हि समाधानाची बाब आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव नगरपरिषदेने नुकतीच आ.आशुतोष काळे यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून विशिष्ट दिवशी विशिष्ट दुकाने सकाळी ७ ते दुपारी ३ वाजे पर्यंत चालू करण्यास आज पासून सुरक्षित अंतर राखून व मुखपट्या आपल्या तोंडाला बांधून परवानगी दिली आहे.त्यामुळे आज दुकानदारांनी आपली दुकाने २४ मार्च नंतर प्रथमच उघडली होती.

भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ७७२ ने वाढून ती ७८ हजार ८२९ इतकी झाली असून २५६५ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या २५ हजार ९२२ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने ९७५ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या ६४ वर जाऊन पोहचली आहे तर दोघांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.मुंबई,ठाणे,पुणे मालेगाव व येवला,संगमनेर हि कोरोनाची नवी केंद्रे ठरली आहेत.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील टाळेबंदी तिसऱ्यांदा वाढवून १७ मे पर्यंत केली आहे.आता टाळेबंदी वाढविण्यासाठी सरकारने तयारी केली आहे.कोपरगाव तालुक्यात दोन बळी गेले आहे.त्यामुळे नागरिकांत अद्यापही या साथीबाबत भय दिसून येत आहे.मात्र कोपरगावात मात्र १० एप्रिल रोजी लक्ष्मीनगर येथे एक जेष्ठ महिलेचा या साथीत बळी गेला आहे.त्या नंतर शिंगणापूर येथे सारी रुग्णाने दुसरा बळी गेला त्याला आता महिना उलटून गेला आहे.मात्र नवीन रुग्ण आढळलेला नाही हि समाधानाची बाब आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव नगरपरिषदेने नुकतीच आ.आशुतोष काळे यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून विशिष्ट दिवशी विशिष्ट दुकाने सकाळी ७ ते दुपारी ३ वाजे पर्यंत चालू करण्यास आज पासून सुरक्षित अंतर राखून व मुखपट्या आपल्या तोंडाला बांधून परवानगी दिली आहे.त्यामुळे आज दुकानदारांनी आपली दुकाने २४ मार्च नंतर प्रथमच उघडली होती.आता बाकी दुकाने कधी उघडणार याकडे उर्वरित व्यापाऱ्यांचे लक्ष लागून आहे.या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष विजय वाहाडणे यांच्या या मागणीला महत्व आले आहे.नागरिकांनी त्यांच्या या मागणीचे स्वागत केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close