कोपरगाव तालुका
जमीन काढून देण्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी,आठ गंभीर जखमी
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील मंजूर ग्रामपंचायत हद्दीत गट क्रं.१५५ यात जाऊन आमची तुमच्याकडे निघत असलेली जमीन काढून द्या अशी मागणी करत आरोपी दत्तात्रय निवृत्ती पायमोडे,संदीप निवृत्ती पायमोडे,कैलास ज्ञानदेव पायमोडे,बाळासाहेब ज्ञानदेव पायमोडे,प्रियांका कैलास पायमोडे,सुनीता कैलास पायमोडे,संगीता दत्तात्रय पायमोडे,अनिता बाळासाहेब पायमोडे,विकास कैलास पायमोडे,ज्ञानदेव वाघूजी पायमोडे सर्व रा.मंजूर यांनी एकत्रित येऊन,”आमचे जमिनीचे क्षेत्र निघत असताना ते तुम्ही परत द्या”असे म्हणून,” आम्ही सरकारी मोजणी आणून काढून घ्या” असे म्हटल्याचा राग येऊन आम्हास त्यांचे हातातील लाकडी दांड्याने मारहाण करून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद आकाश गोरक्षनाथ पायमोडे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.त्यामुळे मंजूर परिसरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान य घटनेत एकूण आठ जण गंभीर जखमी झाले आहे.त्यांना उपचारार्थ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.परिस्थिती तणावात मात्र नियंत्रणात असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यानी आमच्या प्रतिनिधींना दिली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यात फिर्यादी यांच्या शेजारी-शेजारी जमिनी असून फिर्यादी व आरोपी हे एकमेकांचे भाऊबंद आहेत.त्यांचा जमीन वाटपावरून वाद आहे.त्यातच आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वरील नावाचे दहा आरोपी हे आपल्या हातात लाकडी दांडके घेऊन आपल्या राहत्या घराच्या समोर आले व त्यांनी आरोप करत आमच्या जमिनीचे क्षेत्र तुमच्याकडॆ निघत आहे.असे म्हणून आम्हाला जाब विचारण्याचा प्रयत्न केला.त्यांना आम्ही म्हणालो,तुम्ही रीतसर जमिनीची मोजणी शुल्क भरा व सरकारी मोजणी आणून तुमची जमीन काढून घ्या”असे म्हटल्याचा त्यांना राग आला व त्यांनी आपल्या हातातील लाकडी दांड्याने वरील फिर्यादी व साक्षिदार यांना मारहाण केली आहे.शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.साक्षीदार यांचे भ्रमणध्वनी फोडून ट्रॅक्टरचे नुकसान केले आहे.या मारहाणीत आकाश गोरख पायमोडे,गोरक्ष भागवत पायमोडे,परिगाबाई विलास पायमोडे,सागर विलास पायमोडे,सुनीता गोरक्ष पायमोडे,आदी गंभीर रित्या जखमी झाले आहे.कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.नं.१२५/२०२० भा.द.वि.कलंम १४३,१४७,१४८,१४९,३२४,३२३,५०४,५०६,४२७ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ढाका हे करीत आहेत.
दरम्यान या फिर्यादी आधी दत्तात्रय निवृत्ती पायमोडे यांनी आपली फिर्यादी दाखल केली असून त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की,आरोपी गोरक्षनाथ भागवत पायमोडे,आकाश गोरक्ष पायमोडे,अमोल मच्छीन्द्र पायमोडे,विशाल गोरख पायमोडे,विलास उर्फ बबन भागवत पायमोडे,सागर विलास पायमोडे, परिगाबाई विलास पायमोडे सुनीता गोरक्ष पायमोडे आदींनी जमावाने एकत्र येऊन आपल्याला,”तू आमचे शेताचे बांधावरून ये-जा का करतो असे म्हणालो असता त्यावेळी फिर्यादी त्यांना म्हणाला,”हा तुमचा आमचा सामायिक बांध आहे.असे म्हटल्याचा राग आल्याने फिर्यादीला कोयत्याने व लाकडी दांडक्याने मारहाण करत शिवीगाळ करीत असताना तेथील साक्षिदार हे सोडविण्यास गेले असता त्यांनाही वरील आरोपीनी कुऱ्हाडीने लाकडी दांडक्याने व लाथा बुक्यांनी मारहाण करून परत आमच्या बंधने आले तर तुला जीवे मारू अशी धमकी दिली आहे.या वरून कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी गु.र.नं.१२४/२०२० भा.द.वि.कलंम.१४३,१४७,१४८,१४९,३२४,३२३,५०४,५०५ प्रमाणे वरील आठ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान या घटनेत दत्तात्रय पायमोडे,संदीप पायमोडे,बाळासाहेब पायमोडे आदी तिघे जखमी झाल्याचे आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.दरम्यान य घटनेत एकूण आठ जण गंभीर जखमी झाले आहे.त्यांना उपचारार्थ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.परिस्थिती तणावात मात्र नियंत्रणात असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यानी आमच्या प्रतिनिधींना दिली आहे.