कोपरगाव तालुका
..त्या तीन आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील मंजूर वडाचीवाडी येथे रहिवाशी असलेली विवाहित महिला जयश्री गोरक्षनाथ गावंड (वय-२९ ) हि त्यांच्याच विहिरीत मृत अवस्थेत आढळली होती.तीला वर काढल्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आरोपी नवरा गोरक्षनाथ बाळासाहेब गावंड,सासरा बाळासाहेब कारभारी गावंड,सासू लहानबाई बाळासाहेब गावंड या तिघा विरोधात आत्मत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीसांनी गुन्हा दाखल करून या तिघां जणाना काल कोपरगाव न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यानी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस अधिकऱ्यानी दिली आहे.मृत महिलेवर मंजूर या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
दरम्यान या घटनेबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.व आदल्या दिवशी या महिलेला मारहाण झाल्याची माहिती मिळत आहे.या महिलेला एक मुलगा,एक मुलगी आहे.मुलानेच गोदावरीतीरी तणावपूर्ण वातावरणात आपल्या मातेला मुखाग्नी दिला आहे.या मृत महिलेच्या उत्तरीय तपासणीचा अहवाल आज उशिरा येण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी दिली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,मयत महिला जयश्री विलास शिंदे यांचा विवाह साधारण बारा वर्षांपूर्वी मंजूर वडाचीवाडी या ठिकाणी असलेला आरोपी व मयत महिलेचा नवरा गोरक्षनाथ बाळासाहेब गावंड या तरुणाबरोबर थाटामाटात लावून दिला होता.सुरुवातीचे नव्या नवलाईचे नऊ दिवस गेल्या नंतर त्यांना एक मुलगा व एक मुलगी असे दोन अपत्य झाले होते.दरम्यान काही दिवसांपूर्वी नवरा,सासू,सासरे यांनी किरकोळ कारणावरून मयत महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली होती.त्यानंतर एकदा गंभीर स्वरूपाची मारहाण झाल्यावर मयत महिलेच्या वडिलांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अदखल प्राप्त गुन्हा दाखल केला होता.मात्र त्यांना एकत्र बोलावून अधिकाऱ्यानी लेखी समज देऊन पुन्हा समजोता घडवून आणला होता.जानेवारी महिन्यांत नांदण्यासाठी सासरी पाठवले होते.मात्र आज दुपारी दोनच्या सुमारास मयत महिलेच्या बहिणीला आरोपीनी दूरध्वनी करून याबाबत घटनेची माहिती दिली होती.त्या नंतर माहेरच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याची खबर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यास दिली.पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. नवरा,सासरा व सासू आदी तिघांविरुद्ध मृत महिलेचे वडील विलास शिंदे यांनी गुन्हा दाखल केला होता.घटनास्थळी शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधीकारी सोमनाथ वाकचौरे यांचेसह तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी भेट दिली होती.