जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्यात ३५२ व्यक्ती कोरोंटाईन

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात विविध गावाहून आलेल्या ३५२ व्यक्तींना आरोग्य विभागाने आपल्या देखभालीत ठेवण्यात आले असून या पूर्वी देखभालीत ठेवण्यात आलेल्या १४ जणांना चौदा दिवसाचा कालावधी संपल्याने ३६ व्यक्तींना सोडून देण्यात आले तर १० एप्रिल नंतर तालुक्यात एकही कोरोना रुग्ण आढळून आला नसल्याची माहिती कोपरगाव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

मालेगाव व येवला हि कोरोनाची नवी केंद्रे ठरली आहेत.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील टाळेबंदी तिसऱ्यांदा वाढवून १७ मे पर्यंत केली आहे.आता चौथ्या टाळेबंदीची घोषणा करण्यात येणार आहे.कोपरगाव तालुक्यात दोन बळी गेले आहे.येवल्यात अद्यापही नवे रुग्ण आढळत असल्याने कोपरगाव तालुक्यातील नागरिकांत अद्यापही या साथीबाबत भय दिसून येत आहे.

भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ७१८ ने वाढून ती ७५ हजार ०४८ इतकी झाली असून २४४० जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या २४ हजार ४२७ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने ९२१ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या ६४ वर जाऊन पोहचली आहे तर दोघांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.मुंबई,ठाणे,पुणे मालेगाव व येवला हि कोरोनाची नवी केंद्रे ठरली आहेत.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील टाळेबंदी तिसऱ्यांदा वाढवून १७ मे पर्यंत केली आहे.आता चौथ्या टाळेबंदीची घोषणा करण्यात येणार आहे.कोपरगाव तालुक्यात दोन बळी गेले आहे.येवल्यात अद्यापही नवे रुग्ण आढळत असल्याने कोपरगाव तालुक्यातील नागरिकांत अद्यापही या साथीबाबत भय दिसून येत आहे.

या पार्श्वभूमीवर कोपरगाव नगरपरिषद व तालुका प्रशासन काटेकोरपणे दक्षता घेत आहे.कोपरगाव तालुक्याने २८ दिवस ओलांडून आता दुसरी साखळी तोडली आहे.यात साहजिकच आरोग्य विभाग,त्यांचे डॉक्टर,परिचारिका,त्यांना सहकार्य करणारे कर्मचारी यांचे सहकार्य आहेच पण तहसीलदार,पोलीस अधिकारी व कर्मचारी,आर्थिक दुर्बल घटकाना अन्न पुरवठा करणाऱ्या विविध सामाजिक संघटना यांनीही मोठे योगदान दिले आहे.आता तालुक्यात बाहेर गावाहून येणाऱ्या नागरिकांचे चौदा दिवस देखभालीत ठेवण्यात येणार आहे.त्या नंतरच त्यांना त्यांच्या कुटुंबात प्रवेश दिला जाणार आहे असेही डॉ.विधाते यांनी कळवले आहे.या सर्व अधिकारी,कर्मचारी,नागरिक,सामाजिक संस्था यांचे आ. आशुतोष काळे,नगराध्यक्ष विजय वहाडणे आदींनी अभिनंदन केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close