कोपरगाव तालुका
..त्या पायी जाणाऱ्या मजुरांसाठी ९ बस रवाना
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोरोनामुळे अस्वस्थ झालेले व आपल्या घराची ओढ लागून पैशाअभावी पायी घर जवळ करणाऱ्या नागरिकांची अखेर शासनाला दया आली असून त्यांच्या साठी आता राज्य परिवहन मंडळाच्या बस सोडण्याचा निर्णय घेतला असून कोपरगाव शहरातून अशा पायी जाणाऱ्या मजुरांना राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यासाठी कोपरगाव आगाराने दोन दिवसात नऊ बस रवाना केल्या असल्याची माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली आहे.या बसला आ. आशुतोष काळे यांनी हिरवा झेंडा दाखवला आहे.
सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या कोरोना संक्रमणामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील टाळेबंदी तिसऱ्यांदा वाढवून १७ मे पर्यंत केली आहे.आता शासन चौथ्या विधी बाबत निर्णय घेण्याच्या स्थितीत आहे.त्या मुळे परप्रांतीय मजूर,घाबरून गेले आहे.अनेकांनी रेल्वेने आपले घर गाठले आहे.बाकी ज्या मजुरांना रेल्वेने जाणे शक्य नाही अशा नागरिकांची पंचाईत झाली होती व त्यांनी पायीच आपले घर गाठण्याचा प्रयत्न सुरु केला होता.त्यांना आपल्या घराची ओढ स्वस्थ बसू देत नसल्याने व ज्यांच्याकडे थोडेबहुत भाड्या पुरते पैसे आहेत त्यांनी जे साधन मिळेल त्या साधनाने घर गाठण्याचा चंग बांधला होता.त्यांच्यासाठी हा निर्णय दिलासादायक ठरला आहे.
भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ५८० ने वाढून ती ७१ हजार ३४८ इतकी झाली असून २३१० जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या २३ हजार ४०१ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने ८६८ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या ६३ वर जाऊन पोहचली आहे तर दोघांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.मुंबई,ठाणे,पुणे मालेगाव व येवला हि कोरोनाची नवी केंद्रे ठरली आहेत.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील टाळेबंदी तिसऱ्यांदा वाढवून १७ मे पर्यंत केली आहे.आता शासन चौथ्या विधी बाबत निर्णय घेण्याच्या स्थितीत आहे.त्या मुळे परप्रांतीय मजूर,घाबरून गेले आहे.अनेकांनी रेल्वेने आपले घर गाठले आहे.बाकी ज्या मजुरांना रेल्वेने जाणे शक्य नाही अशा नागरिकांची पंचाईत झाली होती व त्यांनी पायीच आपले घर गाठण्याचा प्रयत्न सुरु केला होता.त्यांना आपल्या घराची ओढ स्वस्थ बसू देत नसल्याने व ज्यांच्याकडे थोडेबहुत भाड्या पुरते पैसे आहेत त्यांनी जे साधन मिळेल त्या साधनाने घर गाठण्याचा चंग बांधला होता. मात्र अनेक जण पैशा अभावी तर पायी जाताना दिसत आहे. त्यातून या मजुरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता.या मजुरांची संख्या मोठी आहे.हे तांडे थांबताना दिसत नसल्याने अखेर राज्य सरकारने या मजुरांना जेथे आहे तेथून राज्याच्या सिमा भागापर्यंत सोडण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे त्यांना घर जवळ करण्यास मोठा दिलासा मिळाला आहे.कोपरगावातून मध्यप्रदेश,उत्तर प्रदेश आदी भागात जाण्यासाठी मोठ्या संख्येने हे मजूर नगर-मनमाड या मार्गाचा वापर करत होते.
कोपरगावात अशा मजुरांचा जत्था थांबवून त्यांना विनाशुल्क सोडून देण्यासाठी शासनाचा उपक्रम कौतुकास्पद आहे.कोपरगावात साईबाबा कॉर्नर येथे या बसला आ. आशुतोष काळे यांनी हिरवा झेंडा दाखवला आहे.त्यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे,कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,आदी मान्यवर उपस्थित होते.