जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावातील..त्या नेत्यांवर होणार कारवाई ?

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

देशात व राज्यात कोरोना विषाणूची साथ चालू असताना ती थांबविण्यासाठी प्रशासन अनेक अडचणींचा सामना करून शर्तीचे प्रयत्न करत असताना कोपरगाव शहरात माजी आमदाराने मात्र सुरक्षित अन्तराचा फज्जा उडवत तहसील कार्यालयात आपला मोर्चा नेऊन प्रशासनास पेचात टाकले होते.एरवी प्रशासन साधारण नागरिकांना काठीने सोलून काढत असताना तालुका प्रशासनाने या बाबत सोयीस्कर मौन पाळले होते मात्र याबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची दखल वरिष्ठ कार्यालयाने घेतल्याची खात्रीलायक माहिती हाती आल्याने कारवाईची शक्यता वाढली आहे.त्यामुळे सुरक्षित अंतराचा फज्जा उडविणाऱ्या नेत्यांमध्ये व त्यांच्या कार्यकर्त्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोरोनाबाधित येवला शहर नजीक असल्याने व या शहरातून बऱ्याच नारिकांची ये-जा असल्याने प्रशासन दक्षता घेत आहे.त्यामुळे सुरक्षित अंतराचा मुद्दा अहंम बनला आहे.पोलिसांनी जेथे हा नियम अंत्यविधीलाही लागू केला आहे.व तो न पाळणाऱ्या साधारण नागरिकांना काठीने सोलून काढत असताना तालुक्यातील एका माजी आमदाराने विस्थापितांना अद्याप नऊ वर्षात न्याय न देता कोपरगावातील दुकाने टाळेबंदीच्या काळात सुरु करण्याचा अनाठायी आग्रह धरून आपल्या कार्यकर्त्यांचा भला मोठा मेळा तहसील कार्यालयात नेऊन तेथे सुरक्षित अंतराचा तहसीलदार व पोलीस निरिक्षक यांच्या समोर फज्जा उडवला होता.

भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या १४२ ने वाढून ती ५९ हजार ८३२ इतकी झाली असून १९८७ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या १९ हजार ०६३ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने ७३१ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या ५३ वर जाऊन पोहचली आहे तर दोघांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.मुंबई,ठाणे,पुणे मालेगाव हि कोरोनाची नवी हॉटस्पॉट ठरली आहेत.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील टाळेबंदी तिसऱ्यांदा वाढवून १७ मे पर्यंत केली आहे.कोरोनाबाधित येवला शहर नजीक असल्याने व या शहरातून बऱ्याच नारिकांची ये-जा असल्याने प्रशासन दक्षता घेत आहे.त्यामुळे सुरक्षित अंतराचा मुद्दा अहंम बनला आहे.पोलीस हा नियम न पाळणाऱ्या साधारण नागरिकांना काठीने सोलून काढत आहे.आपल्या घरातल्या,जवळच्या आप्ताच्या अंत्यविधीलाही जेथे प्रशासन परवानगी नाकारत आहे.व नागरिकही प्रशासनाची जनतेबद्दलची काळजी गृहीत धरून तेथे मान तुकवीत असताना तालुक्यातील एका माजी आमदाराने विस्थापितांना अद्याप नऊ वर्षात न्याय न देता कोपरगावातील दुकाने टाळेबंदीच्या काळात सुरु करण्याचा अनाठायी आग्रह धरून आपल्या कार्यकर्त्यांचा भला मोठा मेळा तहसील कार्यालयात नेऊन तेथे सुरक्षित अंतराचा तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्या समोर फज्जा उडवला होता.

दरम्यान आज कोपरगाव मधील काही सामाजिक संकेतस्थळावर कोपरगाव शहरातील दुकाने उघडण्याबद्दल एक संदेश फिरत आहे. परंतु प्रशासनाकडून अद्याप तशा प्रकारचा कोणताही निर्णय झालेला नसून नागरिकांनी खरेदीसाठी घराबाहेर पडू नये. वरिष्ठ पातळीवरून यासंदर्भात काही निर्णय झाल्यास कळवण्यात येईल. तोपर्यंत सर्वांनी घरात राहून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन नगरपरिषदेने तहसीलदार,पोलीस प्रशासनाचे हवाल्याने दिले आहे त्यामुळे नागरिकांनी चुकीच्या संदेशावर विश्वास ठेऊ नये पूर्वीप्रमाणेच अत्यावश्यक सेवा,भाजीपाला दोन दिवस तर किराणा तीन दिवस चालू राहणार आहे.विजय वहाडणे,अध्यक्ष विजय वहाडणे,कोपरगाव नगरपरिषद.

त्यामुळे शहरात सामान्य नागरिकांना एक न्याय तर कायदा पालनावर भाषणे ठोकणाऱ्या पुढाऱ्यांना एक न्याय असे दुर्दैवी चित्र शहर व तालुक्यात तयार झाल्याने शहरातील नागरिकांनी मोठी नाराजी व्यक्त केली होती.तर तालुका प्रशासन व पोलीस अधिकारी यांच्या आजवरच्या चांगल्या कामावर पाणी फिरले होते.पोलीस अधिकाऱ्यांनी मात्र कारवाईची तयारी दाखवली होती हे विशेष ! मात्र आता वरिष्ठ पातळीवर या बाबत निर्णय प्रक्रिया वेगाने सुरु झाल्याची विश्वसनिय माहिती हाती आली आहे.त्यामुळे जबाबदार अधिकाऱ्यांसमोर सुरक्षित अंतराचा फज्जा उडविणाऱ्यावर कारवाईची शक्यता वाढली असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे कायद्याचे पालन करणाऱ्या नागरिकांच्या अपॆक्षा उंचावल्या असल्यास नवल नाही.या बाबत एका कार्यकर्त्याने जिल्हाधिकारी यांचेकडे कायदेभंगाविरुद्ध याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे आधीच तक्रार केली होती.व अधिकाऱ्यांच्या सापत्नपणाच्या वागणुकीबद्दल बद्दल न्याय मागितला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close