कोपरगाव तालुका
कुंभारीत गोदावरीच्या अज्ञात इसमाचे प्रेत

संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कुंभारी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गोदावरी नदीच्या पुलाखाली असलेल्या पाण्यात एक (वय-४५) वर्ष असलेल्या,व रंगाने सावळा व प्रकृती सडपातळ असलेल्या एका इसमाचे प्रेत तरंगताना आढळून आले आहे.त्यामुळे कुंभारीत खळबळ उडाली आहे.
कुंभारीतून कोपरगाव-कोळापेवाडी या रस्ता जात असून धारणगाव व कुंभारी या दोन गावांच्या मध्ये गोदावरी नदीवर एक पूल सन-२००९ साली पूल बांधण्यात आला आहे.वर्तमानात गोदावरी पुलाखाली काही पाणी साठलेले आहे.त्या पाण्यात एक पुरुष जातीचे प्रेत पाण्यात नागरिकांना तरंगताना आढळले. त्यांनी हि खबर पोलीस पाटील व त्यांनी ती कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात कळवली.तालुका पोलिसानी या प्रकरणी स्थळ पंचनामा करून हे प्रेत ताब्यात घेतले व पुढील कारवाईसाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.व या इसमाबाबत कोणाला काही माहिती असल्यास कोपरगाव तालुका पोलिसांना या बाबत कळवावे असे आवाहन केले आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आंधळे हे करीत आहेत.