कोपरगाव तालुका
कोरोना साथीत वैद्यकांचे सहकार्य महत्वाचे-दखल
संपादक-नानासाहेब जवरेकोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी आपण दिलेल्या आवाहनाला सर्व खाजगी डॉक्टरांनी दूरध्वनीच्या व कम्युनिटी क्लिनिकच्या माध्यमातून कोरोनाच्या संकटात गरजू रुग्णांना सेवा देवून केलेलं सहकार्य महत्वपूर्ण असून खाजगी डॉक्टरांनी हे सहकार्य यापुढेही असेच सुरु ठेवावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
सर्दी, खोकला, ताप तत्सम आजाराने त्यामुळे कोपरगाव शहरात कोरोनाबाधित व सारी सदृश्य आजाराने बाधित महिला आढळून देखील आपण कोरोनावर वर्चस्व मिळविले आहे. कोरोनाच्या या संकटाचा समूळ नायनाट करण्यासाठी व नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व खाजगी डॉक्टरांनी हे सहकार्य असेच सुरु ठेवावे-आ.आशुतोष काळे
आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथे त्यांच्या संपर्क कार्यालयाच्या प्रांगणात सुरक्षा अंतराचे नियम पाळून कोपरगाव विधानसभा मतदार संघातील सर्व खाजगी डॉक्टरांची बैठक घेतली यावेळी ते बोलत होते.
यावेळी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसुंदर,डॉ.अजय गर्जे, डॉ.चन्द्रशेखर आव्हाड,राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ.तुषार गलांडे,डॉ. दीपक पगारे,डॉ. अमोल अजमेरे,डॉ. झिया शेख,डॉ.प्रदीप कुडके,आय.एम.ए.चे अध्यक्ष डॉ.मयूर जोर्वेकर,उपाध्यक्ष डॉ.मयूर तिरमखे,डॉ. शेखर फडके,डॉ. महेंद्र गोंधळी,डॉ.संदीप मुरूमकर,डॉ.संजय उंबरकर,डॉ.नारायण आव्हाड,डॉ.शांताराम आढाव,डॉ. विलास आचारी,डॉ.ढाकणे आदी मान्यवर उपस्थित होते.
त्या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, जगाला गुडघे टेकायला लावणाऱ्या कोरोना व्हायरसच्या जीवघेण्या विषाणूमुळे रुग्णांना आरोग्यसेवा कशी द्यावी या विवंचनेत खाजगी डॉक्टर पडले होते. कोरोनाचा संसर्ग डॉक्टरांना व आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना होवू लागल्यामुळे सर्व खाजगी डॉक्टरांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी कोपरगाव शहरातील डॉक्टरांना फोनच्या माध्यमातून सेवा देण्याचे आवाहनाला सर्वच डॉक्टरांनी प्रतिसाद दिला.तसेच सर्दी, खोकला, ताप तत्सम आजाराने त्यामुळे कोपरगाव शहरात कोरोनाबाधित व सारी सदृश्य आजाराने बाधित महिला आढळून देखील आपण कोरोनावर वर्चस्व मिळविले आहे. कोरोनाच्या या संकटाचा समूळ नायनाट करण्यासाठी व नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व खाजगी डॉक्टरांनी हे सहकार्य असेच सुरु ठेवावे.भविष्यात येणाऱ्या कोणत्याही आरोग्य संकटाला परतवून लावण्यासाठी कोपरगावला वैद्यकीय दृष्ट्या सुसज्ज ठेवा.आपणास अडचणी येत असतील तर त्या तात्काळ सांगा आपल्या अडचणी सोडविण्यास तुमच्या पाठीशी उभा आहे अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली व आपणा सर्वांच्या सहकार्याने आपण कोरोनाला निश्चितपणे हरवू असा विश्वास आ.आशुतोष काळे यांनी व्यक्त केला. यावेळी उपस्थित डॉक्टरांना केले.