जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कुंभारीत कृषी विभागाची बियांणांची उगवण क्षमता चाचणी संपन्न

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कुंभारी-(प्रतिनिधी)

आगामी खरीप पिकांचे नियोजन करण्यासाठी अल्पसा वेळ राहिल्याने मान्सुनपुर्व कामांना वेग आला आहे.या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने आपली पूर्व तयारी सुरु केली आहे.आगामी काही दिवसात सुरू होणाऱ्या खरीपाच्या हंगामासाठी लागणाऱ्या बियाणांची टंचाई भासु नये त्याचप्रमाणे मागील वर्षी बिजोत्पादना मध्ये आलेल्या अडचणीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते याही वर्षी सोयाबिन बियाण्याची कमरता भासु नये या उद्देशाने कृषी विभागाच्या कृषी सहाय्यक,कृषी अधिकारी, आदींनी कुंभारी येथे सोयाबीन चाचणी घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे.

संगमनेर उपविभाग कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सोयाबीन बियाण्याचे घरचे घरी उगवण क्षमतेची चाचणी करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. या पार्श्वभुमीवर आज कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथील प्रगतशील शेतकरी विकास अशोक वाघ यांच्या वस्तीवर या उपक्रमाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले होते.

त्यावेळी प्रथम सुती कापडात शंभर सोयाबीन बियांचाच्या रांगा मांडून त्याची गुंडाळी करून त्यावर पाणी मारून ते अर्धवट सूर्यप्रकाशात ठेवले जाते नंतर अनुक्रमे २४,४८,७२, तासांनी त्याची उगवणशक्ती तपासली जाते सदर उगवण शक्ती ६५ टक्क्याच्या पुढे असेल तर शेतकर्‍याला आपल्याकडील बियाणे योग्य असल्याची खात्री होते व योग्य समजले जाते.या प्रयोगानंतर सोयाबीन बियांच्या उगवणशक्ती बद्दलचा आत्मविश्वास शेतकऱ्यामध्ये तयार होतो या अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोयाबीन बियाण्यावर होणारा जास्तीचा खर्च कमी करता येतो व सोयाबीनचे क्षेत्र वाढल्यास तयार होणारी बियाण्याची कमतरता या माध्यमातून भरून काढता येते आज विकास वाघ यांच्या वस्तीवर हे जस ३३५ या वानांचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.

यावेळी तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव,त्यांचे सहाय्यक अधिकारी मनोज सोनवणे, चंद्रकांत दरांगे, कृषी सहायक निलेश बिबवे,अशोक वाघ, सरपंच प्रशांत घुले, उपसरपंच दिगंबर बढे आदींचे यासाठी सहकार्य लाभले सदर या प्रयोगाला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती कृषी विभागाकडुन देण्यात आली आहे .

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close