कोपरगाव तालुका
खाजगी सावकारा कडून जनतेची पिळवणूक थांबवा-मागणी
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रातिनिधी)
करोना साथीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात टाळेबंदी असल्याने गरीब व मध्यम वर्गीय जनतेची कोणत्याही प्रकारे उत्पन्नाचे साधन नाही त्यामुळे त्यांनी आपला मोर्चा खाजगी सावकाराकडे वळवला असून खाजगी सावकाराकडून सर्व सामान्य जनतेची आर्थिक पिळवणूक होत आहे ती थांबविण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
सरकार कडून बी.पी. एल. रेशन कार्ड धारकांना तुटपुंजी मदत मिळाली तसेच काही नागरिकांनी आपला मोर्चा मोफत अन्न छतत्राकडे वळवला मात्र हे सर्वांनाच शक्य नाही एक दीड महिन्या पासून कोणतेही काम नाही त्यामुळे घरात एक रुपयाची आवक नाही त्या मुळे सर्व सामान्य नागरिकांची अवस्था, “आई भीक मागू देईना व बाप पदर पसरू देईना” अशी झाली असून घरात असलेल्या जीवणावश्य वस्तू संपल्या आहेत तर थोडी फार आर्थिक बचत दिड महिन्यात संपलेली असून “कोणी जात्यात तर कोणी सुपात” असल्याने कोणी उसनवारी देण्यास तयार नाही.
आपल्या निवेदनात पोळ पुढे म्हणाले की गेल्या एक महिन्या पासून संपूर्ण देशात टाळेबंदी आहे त्यामुळे गरीब व मध्यम वर्गीय जनतेस कोणत्याही प्रकारे उत्पन्नाचे साधन नाही कामधंदे सुरू असताना प्रत्येक जण काही तरी उलाढाल करून आर्थिक अडचण भागविता येत होती उधार उसनवारी करून चालत होते त्याच प्रमाणे अनेक जण खाजगी बचगट,भिशी,मायक्रो फायनान्स कंपन्या कडून थोडे फार कर्ज काढून आर्थिक अडचण भागवित होते मात्र गेल्या महिन्या पासून सर्व बंद आहे
सरकार कडून बी.पी. एल. रेशन कार्ड धारकांना तुटपुंजी मदत मिळाली तसेच काही नागरिकांनी आपला मोर्चा मोफत अन्न छतत्राकडे वळवला मात्र हे सर्वांनाच शक्य नाही एक दीड महिन्या पासून कोणतेही काम नाही त्यामुळे घरात एक रुपयाची आवक नाही त्या मुळे सर्व सामान्य नागरिकांची अवस्था, “आई भीक मागू देईना व बाप पदर पसरू देईना” अशी झाली असून घरात असलेल्या जीवणावश्य वस्तू संपल्या आहेत तर थोडी फार आर्थिक बचत दिड महिन्यात संपलेली असून “कोणी जात्यात तर कोणी सुपात” असल्याने कोणी उसनवारी देण्यास तयार नाही. त्यातच यापूर्वी सुलभ हप्त्याने घेतलेल्या गृह कर्ज,वाहन कर्ज यांचे हप्ते सरकारने थांबवले असले तरी मोबाईल,फ्रीज आदी छोट्या मोठया वस्तूंचे व मायक्रो फायनान्स बचत गटाकडून वसुलीचे तगादे सुरूच आहे त्या मुळे सर्वांच आर्थिक चणचण भासत आहे ही आर्थिक अडचण दूर करण्यासाठी सर्व सामान्य जनतेने आपला मोर्चा खाजगी सावकारा कडून कर्ज घेण्यासाठी वळवला आहे मात्र ऐन वेळी कोणी सावकार कर्ज देण्यास तयार होत नाही त्याच प्रमाणे कर्ज देण्यास तयार झाले तरी अव्वाचे-सव्वा व्याजाची मागणी करत आहे तसेच महिना भराचे व्याज सुरुवातीलाच वसूल केले जात आहे. त्यामुळे मध्यम वर्गीय जनतेची अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी झाली असून सरकारने सामान्य जनतेची खाजगी सावकारा कडून होणारी आर्थिक पिळवणूक थांबविण्यासाठी कठोर पावले उचलावीत तसेच पोलीस स्टेशन व सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून या आर्थिक पिळवणुकीवर लक्ष ठेवावे त्याचप्रमाणे ज्या खातेदारांचे आर्थिक व्यवहार चांगले होते त्यांना बँकांनी वीस ते पन्नास हजार रुपयांचे तात्काळ क्रेडिट कर्ज उपलब्ध करून देणाचा विचार करावा असेही निवेदनात म्हटले आहे
या निवेदनावर सोमनाथ म्हस्के,किरण अढांगळे, सुजल चंदनशिव, राजू रोकडे,गोपीनाथ ताते,दीपक कांबळे,अशोक पगारे,भारत रोकडे,प्रवीण शेलार तसेच कार्यकर्ते दिलीप कानडे,रवींद्र जगताप,पप्पू वीर,अमित आगलावे आदींनी मागणी केली आहे