कोपरगाव तालुका
वारीतील..त्या रुग्णास केले “होम कोरोंटाईन”

संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील वारी ग्रामपंचायत हद्दीतील एका रासायनिक कारखान्यात आलेल्या कंटेनरच्या चालकास अस्वस्थ वाटू लागल्याने व त्याला उलट्या,चक्कर येणे आदी त्रास झाल्याने त्यास एका रुग्णवाहिकेतून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले असल्याची माहिती दिली होती मात्र नंतर त्यास कोपरगाव ऐवजी त्याच कंपनीतील वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून त्यास केवळ अशक्तपणा जाणवत असल्याचे निदान करून त्यास प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवून “होम कोरोंटाईन” केल्याची माहिती तेथील प्राथमिक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.त्यामुळे वारी परिसरात विविध चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे.
वारीतील रासायनिक कारखान्याच्या दवाखान्यात व नंतर वारी प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून अशक्तपणा खेरीज दुसरे कुठलेही लक्षणे आढळली नाही.त्या नंतर त्या ठिकाणी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास ” होम कोरोंटाईनचा” शिक्का मारून सोडून दिले असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ.पाखरे यांनी दिली आहे.
या संबंधी सविस्तर वृत असे की,वारी ग्रामपंचायत हद्दीतील कंपनीत केमिकल्स वाहतुक करणारे ५०-७० टँकर,कंटेनर तसेच कोळशाचे ट्रक आदी वाहनांची नेहमीच गर्दी असते.कंपनीत विविध ठिकाणाहून विविध रसायने भरलेले टँकर्स येत असतात.तर निर्यात होणारे रासायनिक कँटेनर मधुन मुंबई बंदरात जात असतात.त्यातील एका कंटेनरच्या चालकास अशक्तपणा व कोरोना सदृश लक्षणे उलट्या होणे,चकर येणे आदी प्रकार झाल्यामुळे त्यांस कंपनीच्या रुग्णवाहिकेतून कोपरगाव येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीने कळवली होती.त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.या बाबत आमच्या प्रातिनिधिस अनेक ग्रामस्थांचे भ्रमणध्वनी आले होते.व त्यांच्या बोलण्यातून कोरोनाची काळजी स्पष्ट जाणवत होती.आज त्या बाबत कोपरगाव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी काल असा कोणीही रुग्ण कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात आला नसल्याची माहिती दिली आहे.मात्र असा रुग्ण वारीतील प्रथम रासायनिक कारखान्याच्या दवाखान्यात व नंतर वारी प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून अशक्तपणा खेरीज दुसरे कुठलेही लक्षणे आढळली नाही.त्या नंतर त्या ठिकाणी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास ” होम कोरोंटाईनचा” शिक्का मारून सोडून दिले असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ.पाखरे यांनी दिली आहे.व त्यास कोणाशी संपर्क न साधण्याची सक्त सूचना दिली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.दरम्यान वारी व तालुक्यात पसरलेल्या विविध चर्चांना आता पूर्ण विराम मिळण्यास मदत होणार आहे.