जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

विद्यार्थ्यांनी जीवनात ध्येय निश्चित करावे-खा.लोखंडे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी व्हावयाचे असल्यास त्यांनी आपले आगामी काळातील ध्येय आधीच निश्चित करावे असे आवाहन शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खा.सदाशिव लोखंडे यांनी नुकतेच कोपरगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

कोपरगाव येथील श्रीमान गोकुळचंद विद्यालयात नुकताच गुणवंत विद्यार्थ्यांचा वार्षिक पारितोषिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्या वेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष शंतनू धोर्डे हे होते.

सदर प्रसंगी श्री गोकुळचंद विद्यालयाचे अध्यक्ष कैलास ठोळे, चेअरमन चंद्रकांत ठोळे, सचिव दिलीप अजमेरे, सहसचिव सचिन अजमेरे, आनंद ठोळे, संदीप ठोळे, डॉ. अमोल ठोळे, राजेश ठोळे, मुख्याध्यापक रमेश गवळी, उपमुख्याध्यापक दत्तात्रय कांबळे, पर्यवेक्षक शब्बीर इनामदार, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मीना पाटणी, सुनीता ठोळे इंग्लिश मिडीयमच्या मुख्याध्यापक मकरंद निमोणकर,आदी मान्यवरांसह बहुसंख्य नागरिक पालक,विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक रमेश गवळी यांनी केले तर उपस्थितांना मार्गदर्शन अड्.शंतनू धोर्डे, दत्तात्रय कांबळे,बाळासाहेब कुलधरण आदीनी केले.सुत्रसंचलन सौ,अजमेरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार मकरंद कोऱ्हाळकर यांनी मानले.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close