कोपरगाव तालुका
वहाडणेंच्या..त्या भूमिकेमुळे पालिकेचे लाखो रुपये वाचले-प्रा.शिंदे
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांच्या खंबीर भूमिकेमुळे शहरातील जनतेने कर रूपाने भरलेले लाखो रुपये वाचले आहे असा महत्वपूर्ण दावा कोपरगाव शहर भाजपचे माजी अध्यक्ष प्रा.सुभाष शिंदे यांनी केला आहे.
कोपरगाव पालिकेने वृत्तपत्रांत रीतसर निविदा प्रसिद्ध करून विविध संस्था,उत्पादक यांचेकडून दर मागविले.पण त्यापूर्वीच कोपरगावचे आ.काळे यांनी नगराध्यक्ष वहाडणे यांना पत्र लिहून कळविले कि आपण शहरातील प्रत्येक घरात देण्यासाठी सॅनिटायझर बॉटल कोपरगाव नगरपरिषदेस मोफत पुरवायला तयार आहे.कुणीही निविदा भरली नाही पण आ.काळेंनी दि.२४ एप्रिल रोजीच पत्र दिल्याने शहरातील नागरिकांना मोफत सॅनिटायझर बाटल्या मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.अध्यक्ष वहाडणे व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी संयतपणे हा विषय हाताळल्याने कोपरगाव नगरपरिषदेची लाखो रूपयांची बचत झाली आहे-प्रा.सुभाष शिंदे-माजी अध्यक्ष कोपरगाव शहर,भा.ज.प.
देशभरात कोरोनामुळे कहर उडाला आहे.मुंबई,पुणे,ठाणे,मालेगाव,तर नगर जिल्ह्यात संगमनेर आदी शहरात कोरोनाचे जवळपास ८५ टक्के रुग्ण आहेत.त्याची काळजी करणे गरजेचे आहे व आपण व आपल्या नजीकच्या शहरात कोरोना येऊन पोहचला आहे.शहरातील एक व नजीकच्या गावातील अनेक असे दोन बळी तालुक्यात गेले आहे.त्यामुळे प्राधान्यक्रम ठरवून शहराला व त्यातील जनतेला वाचविण्यास महत्त्व देणे गरजेचे असताना कोपरगावात सॅनिटायझर वाटण्यावरून माजी मंत्री कोल्हे व नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या दोन गटात अकाली शिमगा सुरु होऊन तू-तू-मै-मै चालू झाले आहे.या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी अध्यक्ष प्रा.सुभाष शिंदे यांनी हे प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की,संजीवनी परिवाराने कोपरगाव नगरपरिषदेला पत्र देऊन संजीवनीची सॅनिटायझर बाटलीची किंमत प्रत्येकी २० रु.प्रमाणे घ्या व जनतेला मोफत वाटप करा.नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी कुटिल डाव ओळखला व घाई न करता यापेक्षा कमी दराने बाटल्या मिळाल्या तर नगरपरिषदेची बचत होऊ शकते,म्हणून वृत्तपत्रांत रीतसर निविदा प्रसिद्ध करून विविध संस्था,उत्पादक यांचेकडून दर मागविले.नगराध्यक्ष वहाडणे यांच्या जागी संजीवनीचा एखादा नगराध्यक्ष असता तर नगरपरिषदेच्या तिजोरीचे काय झाले असते याचा इतिहास नागरिकांनी आठवून पाहावा असा शालजोडाही लगावला आहे.व विरोधकांपुढे आरसा धरला आहे.पुढे आपल्या पत्रकात त्यांनी म्हटलें हे की,नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना आपण आवाहन करतो कि,पराभव पचवू न शकणारे नेते व त्यांचे काही चेले जाणीवपूर्वक तुमच्या विषयी ओरड करणार आहेत.२-३ ठराविक पत्रकार व २-४ आश्रित चेले आपले कर्त्यव्य कर्म (?) करतच राहणार आहेत.त्यांना उत्तर देऊन आपला अमुल्य वेळ वाया घालवू नका.त्यांचे पोटच त्या नेत्यांवर चालत असल्याने त्यांना खाल्या मिठाला जागावे लागते त्यांची मजबूरीं आपल्याला माहिती आहे.त्यांना उत्तर देण्याचे काम तुमचे नाही.तुम्ही व कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी चांगले काम करत आहात,तसेच काम चालू ठेवा.हे मतलबी राजकारणी तुम्हाला अडथळे आणणारच.त्यांना महत्व न देता काम सुरूच ठेवा.शहरातील जनता तुमच्याबरोबर आहे असा विश्वासही प्रा.सुभाष शिंदे यांनी शेवटी व्यक्त केला आहे.