जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात साई समर्थ मंडळाकडून किराणा,भाजीपाला वाटप

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

संपूर्ण जग आज कोरोनाशी लढत असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात टाळेबंदी असल्यामुळे अनेक नागरिकांना अनेक अडचणीनां सामोरे जावे लागत आहे. कोपरगाव तालुक्याचे आ.आशुतोष काळे नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी विविध उपाययोजना करत असून त्यांच्या सहकार्यातून साईसमर्थ प्रतिष्ठान कोपरगाव यांच्या वतीने प्रभाग क्रमांक २ मध्ये गरजु नागरिकांना नुकताच भाजीपाला व किराणा वाटप करण्यात आले आहे.

आर्थिक दुर्बल घटकाना या टाळेबंदीमुळे रोजगारासाठी बाहेर पडता येत नसल्याने जीवन कंठणे अवघड बनले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे महाराष्ट्रातील टाळेबंदी ३० एप्रिल पर्यंत सरकारने वाढविली आहे.कोपरगाव तालुक्यात दोन बळी गेले आहे.नागरिकांत अद्यापही या साथीबाबत भय दिसून येत आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव नगरपरिषद हद्दीत साई समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने नागरिकांना दिलासा देण्यासाठी किराणा व भाजीपाला वाटप करण्यात आले आहे.

भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या २६० ने वाढून ती ३१ हजार ६२० इतकी झाली असून १०१० जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या ९ हजार ३१८ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने ४०० जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या ४२ वर जाऊन पोहचली आहे तर चौघाचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.आर्थिक दुर्बल घटकाना या टाळेबंदीमुळे रोजगारासाठी बाहेर पडता येत नसल्याने जीवन कंठणे अवघड बनले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे महाराष्ट्रातील टाळेबंदी ३० एप्रिल पर्यंत सरकारने वाढविली आहे.कोपरगाव तालुक्यात दोन बळी गेले आहे.नागरिकांत अद्यापही या साथीबाबत भय दिसून येत आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव नगरपरिषद हद्दीत साई समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने नागरिकांना दिलासा देण्यासाठी किराणा व भाजीपाला वाटप करण्यात आले आहे.

कोरोना विरुद्धच्या या लढाईत साईसमर्थ प्रतिष्ठान आपला खारीचा वाटा उचलत असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्ते डॉ.अनिरुद्ध काळे यांनी दिली आहे. सर्वांच्या साथीने लवकरच आपण या कोरोनाविरुद्धच्या लढाईत यशस्वी होऊ. तोपर्यंत नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे व अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन त्यांनी शेवटी केली आहे.सदर प्रसंगी राजेंद्र बोरावके,संदीप सावतडकर,रुपेश वाघचौरे,राहुल हंसवाल,आन्ना लोखंडे,आशिष राजपाल,मंगेश झगडे,आनंद डाके,सोमनाथ आढाव आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close