जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोरोनाच्या लढ्यात नागरिकांनी सहकार्य करावे-आवाहन

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरंगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातून कोरोना विषाणूला हरविण्यासाठी नागरिकांनी तालुका प्रशासनास सहकार्य करावे तरच हि लढाई आपल्याला जिंकता येईल असे प्रतिपादन कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी काल कोपरगाव नगरपरिषदेत एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

आरोग्य विभागाचे कर्मचारी व आशा सेविका नागरिकांची आरोग्य तपासणी करीत असतांना त्यांच्याकडे अत्याधुनिक संरक्षक साधनसमुग्री नसल्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन तातडीने त्यांना संरक्षक साहित्य उपलब्ध करून दिले असल्याचे त्यांनी सांगितले.यामध्ये ५०० पी.पी.ई.किट,३००० एन ९५ मास्क,३००० ट्रिपल लेअर मास्क,४२ थर्मामिटर,१८० एम.एल.च्या ३००० हँड सॅनिटायझर बाटल्या व पोलिसांसाठी १०० फेस शिल्ड मास्क आदी साहित्याचा समावेश आहे.

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील नागरिकांची घरोघरी जाऊन कुटुंबाची तपासणी करणाऱ्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना व प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आ.आशुतोष काळे यांच्यावतीने संरक्षक साहित्याचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी ते कोपरगाव नगरपरिषदेत नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,कोपरगाव शहरात कोरोना बाधित महिला रुग्ण आढळून आल्यानंतर प्रशासनाने अधिक कडक उपाय योजना केल्यामुळे जवळपास तीन आठवड्याचा कालावधी होत आला असून कोपरगाव मतदार संघातील नागरिकांना कोरोनापासून दूर ठेवण्यात यश मिळाले आहे.सर्व प्रकारच्या उपाय योजना राबविल्या जात असून ग्रामीण भागात आशा सेविका,अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या सहाय्याने घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे.त्याचप्रमाणे शहरात देखील कोपरगाव नगरपरिषदेला प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याच्या सूचना दिल्या असून आरोग्य तपासणी सुरु करण्यात आली आहे.कोपरगाव मतदार संघात आपण कोरोनाला काबूत ठेवले असले तरी कोरोनावर वर्चस्व मिळविलेले नाही.कोरोनाविरुद्ध लढा यापुढे देखील असाच सुरूच राहणार आहे. या लढ्यात नागरिकांची भूमिका अतिशय महत्वाची असून कोरोनावर विजय मिळविण्यासाठी नागरिकांनी या आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णाला ताबडतोब तपासणीसाठी पाठवावे व बाकी नागरिकांनी घरातच बसून सहकार्य करावे असे आवाहन आ.काळे यांनी शेवटी केले आहे.

या वेळी आरोग्य कर्मचारी,पोलीस प्रशासन,आशा सेविका,अंगणवाडी सेविका,कोरोना विरोधात लढ्यात उतरलेल्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुरक्षा साहित्याचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी सभापती पौर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे,गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे,कोपरगाव ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसौन्दर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष विधाते, डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम रुग्णालयाचे डॉ.उंडे,पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर,पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी सर्व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी आ.काळे यांच्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close