जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कुकडीतुन पारनेरकरांसाठी तातडीने पाणी सोडा-माजी सरपंच चंद्रकात लामखडेंची मागणी

अन्यथा निघोजला आंदोलन छेडणार

जाहिरात-9423439946

निघोज प्रतिनिधी दी. 25 मार्च
कुकडी डाव्या कालव्याला पाणी सोडून सरकारने जनावरांना जगवण्याची भुमिका घ्यावी अशी मागणी निघोज गावचे माजी सरपंच व निघोज परिसर कृषी फलोद्यान सहकारी संस्थेचे चेअरमन चंद्रकांत लामखडे यांनी केली आहे. दि. 10 एप्रिलला कुकडी डावा कालव्याचे पाणी सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समीतीच्या मुंबई येथील बैठकीत घेण्यात आला आहे. मात्र तो पर्यंत जनावरे जगतील का हा प्रश्न निर्माण झाला आहे. गेली महिनाभरापासून कुकडी डावा कालवा लाभक्षेत्रातील गावामधील पाण्याचे झरे आटले आहेत. जनावरांचा हिरवा चारा जळून चालला आहे. त्यांच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी टॅंकरने पाणी आणावे लागत आहे अशी परस्थीती निर्माण झाली आहे. सरकारने गोधन वाचवण्यासाठी ते कसायाकडे जाउ न देण्यासाठी गेली पाच वर्षात कसायांच्या विरोधात कडक कारवाई केली आहे. गोमांस विक्रेत्यांवर कडक कारवाई केली आहे. सध्या मात्र तेच गोधन पाणी व चाऱ्याअभावी तडफडत आहे असे असताना शिवसेना व भाजपचे जिल्ह्यातील पुढारी दक्षिण लोकसभा मतदारसंघात पाण्याचे राजकारण करीत आहेत. ही जनतेच्या दृष्टीने शोकांतिका आहे. कुकडी डाव्या कालव्याला पाणी सोडण्याएवढे पाणी कुकडी प्रकल्पातील धरणात शिल्लक आहे अशी परस्थीती असताना चुकीची आकडेवारी प्रसिद्ध करुन पाटबंधारे विभागाचे अधिकारी जनतेची दिशाभूल करीत आहेत. प्रत्यक्षात 12 टीएमसी पेक्षा जास्त पाणीसाठा कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणामध्ये शिल्लक आहे. यातील सहा टीएमसी पाणी जरी सोडले तरी पाणी शिल्लक राहाणार आहे. शिवाय पारनेर, श्रीगोंदा, कर्जत जामखेड व तसेच सोलापूर जिल्ह्य़ातील करमाळा पर्यंत या पाण्याचा फायदा लाखो जनतेला व त्यांच्याकडे असणाऱ्या लाखो पशु पक्षी व जनावरांना मिळणार आहे. हे पुण्याचे काम आहे पाणी सोडणे ही सरकारची जबाबदारी आहे. एकीकडे राम मंदीर झाले पाहिजे हा भाजप सेना सरकारचा निवडणुकीतील जाहिरनामा आहे. ज्या गायांचे दर्शन घेतल्यानंतर 33 कोटी देवांचे दर्शन घेतल्याचे पुण्य मिळते अशी आपली संस्कृती आहे. अशाच गायांना पाणी व चाऱ्या अभावी मारण्याचे पाप हे सरकार कसे काय करु शकते हा प्रश्न तमाम जनतेला सतावत आहे. गेली पाच वर्षात शेतीमालाला भाव नाही यासाठी कुक्कुटपालन असो की दूधउत्पादन या माध्यमातून चार पैसे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी जोडव्यवसायाला गती देण्याचे काम केले. आज मात्र दूधाला भाव नाही शेतीमालाला भाव नाही अशा परस्थीती आहे गेली पाच वर्षात शेतकरी मेटाकुटीला आला आहे कर्जबाजारी झाला आहे. कर्जमाफीच्या नावाखाली या सरकारने गोरगरीब जनतेची व शेतकऱ्यांची पिळवणूक केली आहे. या परिस्थितीतून थोडे फार सावरण्यासाठी तसेच गोधन वाचवण्यासाठी कुकडी डावा कालव्याचे पाणी दि. 31 मार्च अखेर सोडण्याची मागणी लामखडे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close