जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

मढीतील ..त्या तीन रुग्णांचा अहवाल आला !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात मढी बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीत कोरोनाचे आणखी तीन संशयित रुग्ण आढळून आले होते त्यांचा अहवाल पुण्याला पाठविण्यात आला होता.त्यांचे ते अहवाल आज उपलब्ध झाले असून ते तीनही रुग्ण निरंक आढळल्याने तालुका प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला आहे.हि माहिती कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

कोपरगाव तालुक्यातील मढी बुद्रुक येथील तीन रुग्णाच्या अहवालाची प्रतीक्षा होती.हे तिन्ही रुग्ण पाथरे येथील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आले होते.या अहवालाकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून होते.या निरंक अहवालाने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ४२७ ने वाढून ती १८ हजार ९७० इतकी झाली असून ६०१ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या ४ हजार ६६६ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने २३२ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या २९ वर जाऊन पोहचली आहे तर दोघाचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे महाराष्ट्रातील टाळेबंदी ३० एप्रिल पर्यंत सरकारने वाढविली आहे.नागरिकांत अद्यापही या साथीबाबत भय दिसून येत आहे.त्यातच कोपरगावात लक्ष्मीनगर या उपनगरात एक साठ वर्षीय महिलेचे नुकतेच कोरोनाने निधन झाले होते.

त्या पाठोपाठ शिंगणापूर येथील एका महिलेचे सारी आजाराने निधन झाल्याची घटना ताजी असताना मढी बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीत अजून तीन संशयित रुग्ण आढळून आले होते.नगर जिल्ह्यात आतापर्यंत तीन रुग्णांनी आपला प्राण सोडला आहे.तथापि एका माहिती नुसार कोपरगाव शहरातील रुग्णांचा अहवाल नकारात्मक आला होता मात्र कोपरगाव तालुक्यातील मढी बुद्रुक येथील तीन रुग्णाच्या अहवालाची प्रतीक्षा होती.हे तिन्ही रुग्ण पाथरे येथील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आले होते.या अहवालाकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून होते.या आधी लक्ष्मीनगरात मयत रुग्णाच्या संपर्कात आलेल्या अठरा रुग्णांना कोपरगाव येथील हॉटेल स्पॅन येथे आरोग्य अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.या अहवालाने तालुक्यात समाधान व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close