कोपरगाव तालुका
कोपरगावात पावसाच्या गडगडासह सौम्य सरी
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर व तालुक्यात काही ठिकाणी आज सकाळी सात वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाच्या गडगडासह सौम्य सारी कोसळल्या आहे.मात्र त्यापासून तालुक्यात कोठेही जीवित अथवा वित्तीय नुकसान झाल्याची खबर नसल्याची माहिती कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
राज्यात पडत असलेल पावसाने गेल्या काही दिवसापासून विश्रांती घेतली होती. परंतु काल सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. वर्तमानात सुरु असलेल्या या अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिके असलेला बळीराजा सुखावला आहे.तर द्राक्ष व कांदा पिके,रब्बी पिके असलेले शेतकरी मात्र धास्तावले आहेत.
राज्यात पडत असलेल पावसाने गेल्या काही दिवसापासून विश्रांती घेतली होती. परंतु काल सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. वर्तमानात सुरु असलेल्या या अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिके असलेला बळीराजा सुखावला आहे.तर द्राक्ष व कांदा पिके,रब्बी पिके असलेले शेतकरी मात्र धास्तावले आहेत.गत काही दिवसापासून वातावरणात मोठा उकाडा वाढला असून वायव्ये दिशेकडून हा उष्मा वाढला आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये नुकत्याच झालेल्या पावसाने शेती आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले. धुळ्याच्या शिरपूर परिसराला याचा सर्वाधिक फटका बसला. याठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. काही भागांमध्ये गारपीटही झाली. यामुळे फळबागा आणि गहू व हरभरा पिकाचे मोठे नुकसान झाले. तसेच शिरपूरमध्ये मुसळधार पावसामुळे भिंत पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मात्र कोपरगाव तालुक्यात नुकसान झाल्याचे वृत्त नाही हि समाधानाची बाब आहे.