नगर जिल्हा
..त्या वादग्रस्त शिक्षण विस्तार अधिकाऱ्याची पुन्हा लुडबुड सुरु !

संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात गत दहा-पंधरा वर्षापासून वादग्रस्त ठरलेल्या प्रभारी शिक्षण अधिकाऱ्यांस कोपरगावात विविध शिक्षण संघटनांनी साधारण सप्टेंबर महिन्यात आंदोलने करून पिटाळून लावलेले असताना व आता राहाता येथील शिक्षण विभागाचा प्रभार असताना भाजप नेत्याच्या आशीर्वादाने या वादग्रस्त शिक्षण विस्तार अधिकारी पुन्हा कोपरगावात लुडबुड करू लागल्याची विश्वसनिय माहिती हाती आली आहे.त्यामुळे शिक्षक संघटनांनी पुन्हा एकदा दंड थोपटण्याची तयारी चालविली असल्याचे वृत्त हाती आली आहे.
कोपरगाव तालुक्यात जिल्हा परिषदेचे स्वतंत्र गटशिक्षण अधिकारी हे पद आहे.मात्र या ठिकाणी आपल्या राजकीय सोयीसाठी कायम हे पद रिक्त ठेऊन या ठिकाणी एका महिला शिक्षण विस्तार अधिकाऱ्याची नियुक्ती करून आपले हितसंबंध सांभाळले जात असल्याचे वारंवार लक्षात आले आहे.हि काही एक दोन वर्षाची गोष्ट नाही गेले पंधरा-सोळा वर्षांपासून याची पुनरावृत्ती होत आहे.त्यामुळे सर्वच शिक्षक संघटना नाराज आहे.विशेष म्हणजे आता कोपरगाव पंचायत समिती व जिल्हा परिषदेवर आता काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व असताना हि खेळी होतेच कशी असा प्रश्न शिक्षकांच्या मनात निर्माण झाला आहे.
कोरोनामुळे शाळा सुरु होण्यास विलंब होण्याची शक्यता गृहीत धरून शिक्षण खात्याने सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पुढील शैक्षणिक वर्षाचे नियोजन करण्यासह शाळा सुधारणा योजनांचा आराखडा तयार करण्याचे आदेश बजावलेले आहे.ऑनलाइन शिक्षण उपलब्ध करून देण्याबाबत शिक्षकांनी तयारी करावी तसेच गेल्या अनेक दिवसा पासून सुटीवर असलेल्या विद्यार्थ्यांनी घरी राहून कशा प्रकारे अभ्यास करावा याची माहिती दयावी असे कळविण्यात आलेले आहे.यासाठी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनीं नव्या वर्षाचे वेळा पत्रक तयार करवून कमी वेळेत कशाप्रकारे विद्यार्थ्यांना शिकवता येईल याबाबतचे नियोजन करण्याचे आदेश दिलेले आहे.या वेळी कोरोना मूळे परीक्षा न देताच विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आल्याने आता त्यांच्याशी सामाजिक संकेत स्थळावरून संपर्क साधून गृहभ्यास दिला जाणार आहे.दर उन्हाळ्यात शिक्षण खात्यामार्फत निकाल देते वेळी गृहभ्यास दिला जातो.मात्र या वेळी कोरोनामुळे हि बाब शक्य झालेली नाही म्हणून हा उपक्रम सुरु आहे.त्यासाठी विद्यार्थ्यांनी सुटीच्या काळात अभ्यास कसा करावा याची माहिती द्यावी तसेच शाळा सुधारणा आराखड्यासह इतर माहिती तयार करण्याच्या सूचना देण्याचे काम नुकतेच संपन्न झाले आहे.
श्रीम शेख शबाना यांनी त्यांचे कडे असलेल्या मुळ सहजानंदनगर बिटचा कार्यभार सांभाळून नव्याने शिर्डी बिटचा अतिरिक्त कार्यभार पाहावा असे 25 नोव्हेंबरच्या आदेशात नमूद केले आहे. केंद्र प्रमुख यांनी आपल्या केंद्रातील मुअ च्या झुम मिंटीग मागील आठवड्यात घेतल्या.केंद्र प्रमुख हे होस्ट असल्याने त्यांनी आपल्या वरिष्ठांना मिटिंगमध्ये ऑनलाईन इनव्हाईट केले होते. श्रीमती शेख शबाना यांनी कोणतीही मिटिंग आयोजित केली नव्हती .एक दोन केंद्रातून निकाल कसा करावा याबाबत विचारल्यावर त्यांनी मार्गदर्शन केले-पोपटराव काळे,गट शिक्षण अधिकारी,कोपरगाव पंचायत समिती.
यात गोम अशी की,कोपरगाव पंचायत समितीत स्वतंत्र शिक्षण अधिकारी म्हणून पोपटराव काळे यांची नियुक्ती गत वर्षी शिक्षकांच्या आंदोलना नंतर करण्यात आली आहे.असे असताना त्यांनीच या सूचना देण्याचे काम अभिप्रेत असताना किंवा त्यांच्या कनिष्ठ विस्तार अधिकाऱ्याने हे काम करणे अपेक्षित असताना ज्यांची वादग्रस्त प्रभारी शिक्षण अधिकारी म्हणून बदली करण्यात आली त्यांनीच चलचित्र (व्ही.सि.) बैठक घेऊन वादाला तोंड फोडले आहे.त्यामुळे हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.त्यामुळे या वादग्रस्त प्रभारी शिक्षण अधिकाऱ्याची पुन्हा नियुक्ती झाली आहे का ? असा प्रश्न शिक्षकांच्या मनात निर्माण झाला आहे.