क्रीडा विभाग
…या ठिकाणी संपन्न राज्य शालेय रोलबॉल स्पर्धा!

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
महाराष्ट्र क्रीडा व युवक सेवा संचलनालय व अहील्यानगर येथील जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने आत्मा मालिक च्या प्रांगणात दिनांक २० ते २२ नोव्हेंबर २०२५ दरम्यान राज्यस्तरीय शालेय रोलबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचे उद्घाटन शिर्डीचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती व कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत आदींच्या हस्ते क्रीडा-ज्योत प्रज्वलित करून करण्यात आले होते.

“रोलबॉल क्रीडा प्रकार चपळता,चतुराई,कौशल्यता बरोबरच शारीरिक क्षमतेचा सचोटीचा आहे.खेळामुळे आपली खिलाडू वृत्ती विकसित होते आणि शिस्त बाळगली जावून खेळाडू हे देशाचे चांगले नागरिक घडतात”-अमोल भारती,उपविभागीय पोलिस अधिकारी,शिर्डी.
सदर उद्घाटन प्रसंगी बोलताना पोलीस उपाधीक्षक भारती म्हटले की,”रोलबॉल क्रीडा प्रकार चपळता,चतुराई,कौशल्यता बरोबरच शारीरिक क्षमतेचा सचोटीचा आहे.खेळामुळे आपली खिलाडू वृत्ती विकसित होते आणि शिस्त बाळगली जाते म्हणूनच खेळाडू हे देशाचे चांगले नागरिक घडतात.खेळाडू ही देशाची संपत्ती आहे,असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

“खेळाला जीवनात अनन्य साधारण महत्त्व आहे.प्रत्येक व्यक्तीने कोणता-ना-कोणता खेळ खेळला पाहिजे.तसेच मानसिक व शारीरिक तंदुरुस्तीसाठी खेळ हा एक महत्त्वाचा अविभाज्य घटक आहे”-महेश सावंत,तहसीलदार,कोपरगाव.
सदर प्रसंगी तहसीलदार महेश सावंत म्हणाले की,”खेळाला जीवनात अनन्य साधारण महत्त्व आहे.प्रत्येक व्यक्तीने कोणता-ना-कोणता खेळ खेळला पाहिजे.तसेच मानसिक व शारीरिक तंदुरुस्तीसाठी खेळ हा एक महत्त्वाचा अविभाज्य घटक आहे. तसेच ज्या खेळाडूंना या स्पर्धेत हार पत्करावी लागली त्यांनी नाउमेद न होता आपल्या सरावांमध्ये सातत्य ठेवावे. खेळा प्रती निष्ठा बाळगावी एक दिवस यश तुमचेच आहे असे ते यावेळी म्हटले आहे.
दरम्यान यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे हे म्हणले की,”आत्मा मालिक शैक्षणिक संकुल खेळामध्ये नेहमीच अग्रेसर आहे.या ठिकाणी शैक्षणिक अभ्यासाबरोबरच खेळालाही प्राधान्य दिले जाते त्यामुळे या ठिकाणावर अनेक खेळाडू तयार होत आहे.आलेल्या संघ व्यवस्थापकांनी येथील उपलब्ध सोयी-सुविधांची पाहणी करावी,असे आवाहन त्यांनी यावेळी केले.तसेच आत्मा मालिक संकुलाने या स्पर्धेचे यजमानपद स्वीकारून केलेल्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल त्यांनी आत्मा मालिक संकुलाचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
या स्पर्धेमध्ये वयोवर्ष १४, १७ व १९ वयोगटातील ८ विभागातील मुले व मुली मिळून एकूण ४८ संघ सहभागी झाले असून एकूण ६७२ खेळाडू व संघ व्यवस्थापक व प्रशिक्षक उपस्थित होते. या उद्घाटन प्रसंगी आत्मा मालिकच्या विद्यार्थ्यांनी सिल्क मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची दाद मिळवली आहे.
यावेळी विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे उपाध्यक्ष बाळासाहेब गोरडे,विश्वस्त प्रकाश गिरमे,जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे,रोलबॉल संघटना अहिल्यानगरचे सचिव सोमनाथ घुगे,तालुका क्रीडाधिकारी प्रवीण कोंढावळे,आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाचे व्यवस्थापक सुधाकर मलिक,साईनाथ वर्पे,प्राचार्य निरंजन डांगे,माणिक जाधव,संदीप गायकवाड,नामदेव डांगे,अशोक शिंदे,सदस्य नितीन बलराज,पंचप्रमुख,आनंद पटेकर,रवींद्र देसाई,जयप्रकाश सिंह,प्रमोद काळे आदि मान्यवर उपस्थित होते.



