जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोरोनासाठी..या आश्रम ट्रस्टने दिला लाखांचा निधी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

देशात कोरोना विषाणूने कहर केलेला असताना यावर अद्यापही उपचार नसल्याने सरकारसह जनता हतबल झालीय आहे.बचाव करणे हेच तेवढे काम या दोन्ही घटकांच्या हातात आहे.तरीही या संकातून बाहेर येण्यासाठी अनेक उद्योजक व दानशूर व्यक्ती समोर येत असताना दिसत असून कोपरगाव तालुक्यातील श्री संत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज समाधी स्थान ट्रस्ट, कोपरगाव यांचेकडून रु.१ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीस प्राप्त झाला असल्याची माहिती कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

कोरोनोमुळे अनेक आर्थिक दुर्बल घटक,कामगार आपल्या घरापासून दूर कुठेतरी अडकून पडले आहे.त्यांना घराची ओढ आहे.मात्र घरापर्यंत जाता येत असल्याने ते मध्येच अडकून पडले आहे.त्यांच्या जेवणाची भ्रांत निर्माण झालीय आहे.सरकार आपल्या अपरिने ते काम करीत आहे.मात्र ते प्रयत्न पुरेसे पडत नसल्याने अनेक दानशूर व्यक्ती,उद्योजक,विश्वस्त व्यवस्था समोर येऊन सरकारला मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दान देत आहे.

भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ५९७ ने वाढून ती १२ हजार ९६८ इतकी झाली असून ४२८ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर ती १६५ ने वाढून संख्या ३ हजार ०८१ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने १८७ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या १ ने वाढून २८ वर जाऊन पोहचली आहे तर दोघाचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे महाराष्ट्रातील टाळेबंदी ३० एप्रिल पर्यंत सरकारने वाढविली आहे.नागरिकांत अद्यापही या साथीबाबत भय दिसून येत आहे.या साथीला आटोक्यात आणण्यासाठी अद्याप तरी कोणतीही लस उपलब्ध नाही. अशा स्थितीत केवळ बचाव हाच मार्ग आहे मात्र अनेक आर्थिक दुर्बल घटक,कामगार आपल्या घरापासून दूर कुठेतरी अडकून पडले आहे.

त्यांना घराची ओढ आहे.मात्र घरापर्यंत जाता येत असल्याने ते मध्येच अडकून पडले आहे.त्यांच्या जेवणाची भ्रांत निर्माण झालीय आहे.सरकार आपल्या अपरिने ते काम करीत आहे.मात्र ते प्रयत्न पुरेसे पडत नसल्याने अनेक दानशूर व्यक्ती,उद्योजक,विश्वस्त व्यवस्था समोर येऊन सरकारला मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दान देत आहे.साईबाबा संस्थानचे नुकतेच सरकारला पन्नास कोटी रुपयांचे दान दिले आहे.पंढरपूर येथील ट्रस्टने दान दिल्याच्या बातम्या आहेत.अशातच कोपरगाव बेट येथील जनार्धन स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व त्यांची समाधी असलेल्या श्री संत सदगरु जनार्दन स्वामी समाधी ट्रस्टचे अध्यक्ष मोहनराव चव्हाण यांनी एक लाख रुपयांचा धनादेश नुकताच कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांचेकडे सोपवला आहे.यावेळी नायब तहसीलदार योगेश कोतवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close