कोपरगाव तालुका
..या सहकारी बँकेला १ कोटी ३९ लाखाचा नफा
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
सन २००४ पासून बँक खडतर परिस्थितीतून जात होती. २००२ सालापासून सभासदांना भाग भांडवलावर लाभांश मिळत नव्हता तरीही प्रतिकूल परिस्थितीवर मात करून बँकेने प्रगती केली आहे. बँकेने ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात १ कोटी ३९ लाख रुपये निव्वळ नफा मिळविला आहे.
सन २००४ पासून बँक खडतर परिस्थितीतून जात होती. २००२ सालापासून सभासदांना भाग भांडवलावर लाभांश मिळत नव्हता तरीही प्रतिकूल परिस्थितीवर मात करून बँकेने प्रगती केली आहे. बँकेने ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात १ कोटी ३९ लाख रुपये निव्वळ नफा मिळविला आहे. आजमितीस बँकेच्या ठेवी रु. ९३५१.८९ लाख, कर्जवाटप रु. ५७०१.१२ लाख, वसूल भागभांडवल रु. ४६८.४६ लाख, गुंतवणूक रु. ४३९६.५२ लाख, राखीव व इतर निधी रु. ८२८.६६ लाख इतका आहे. बँकेला माजी आ.अशोक काळे यांचे मार्गदर्शन मिळत आहे.बँक दि. ३१ मार्च अखेरच्या सभासदांना रिझर्व्ह बँकेच्या पूर्व परवानगीने सभासदांना लाभांश देणार असल्याचे आ. काळे यांनी केलेले सुतोवाच स्वागतार्ह असल्याचे बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब कोते व मुख्य कार्यकारी व्यवस्थापक बापूसाहेब घेमुड यांनी म्हटले आहे.