जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोरोनासाठी खाजगी वैद्यकांची सरकारी यंत्रणेला मदत !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्यात कोरोना साथीचा कहर उडालेला असताना व त्यात राज्यात अनेक बाली गेलेले असताना अनेकांनी आपले खाजगी दवाखान्याचे दरवाजे रुग्णांना बंद करून घेतलेले असताना कोपरगावात मात्र खाजगी वैद्यकानी सरकारी अधिकाऱ्यांच्या आवाहनाला साथ देत सरकारी वैद्यकीय विभागास आपली मदत देऊ केली असल्याची दुर्मिळ घटना कोपरगावात घडली आहे.त्याबाबत कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी समाधान व्यक्त केले आहे.

या बाबत तालुका आरोग्य विभागाने या वैद्यकांना एक आवाहन केले होते.केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत करोना साथीमध्ये काम करण्याची इच्छा दर्शवली. ही निश्चितच अभिनंदनिय बाब आहे. या सर्वांचे गट विकास अधिकारी दिलीप सोनकुसळे,पंचायत समिती उपसभापती अर्जुनराव काळे, सभापती पौर्णिमा जगधने यांनी अभिनंदन केले आहे.

भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ५९७ ने वाढून ती १२ हजार ९६८ इतकी झाली असून ४२८ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर ती १६५ ने वाढून संख्या ३ हजार ०८१ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने १८७ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या १ ने वाढून २८ वर जाऊन पोहचली आहे तर कोपरगाव तालुक्यात दोन बुजुर्ग महिलांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे महाराष्ट्रातील टाळेबंदी ३० एप्रिल पर्यंत सरकारने वाढविली आहे.नागरिकांत अद्यापही या साथीबाबत भय दिसून येत आहे.अनेक खाजगी वैद्यकानी आपली कवाडे आपल्या रुग्णानां बंद करून घेतल्याची अनेक उदाहरणे समोर येत असताना कोपरगावात मात्र खाजगी वैद्यकानी मात्र आता चांगला निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.

या बाबत तालुका आरोग्य विभागाने या वैद्यकांना एक आवाहन केले होते.केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत करोना साथीमध्ये काम करण्याची इच्छा दर्शवली. ही निश्चितच अभिनंदनिय बाब आहे. या सर्वांचे गट विकास अधिकारी दिलीप सोनकुसळे,पंचायत समिती उपसभापती अर्जुनराव काळे, सभापती पौर्णिमा जगधने यांनी अभिनंदन केले आहे. आरोग्य विभागाने कोरोना विरुद्ध लढण्यासाठी चार आरोग्य पथके तयार केली आहेत. यामध्ये दोन डॉक्टर, दोन परिचारिका,एक आरोग्य सेवक,दोन शिपाई यांचा समावेश आहे. ही पथके तहसीलदार योगेश चंद्रे,वैद्यकीय अधिक्षक डॉ.कृष्णा फुलसुंदर,विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाते यांचे मार्गदर्शनाखाली काम करणार आहेत.त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close