जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

..या सभासदांना मोफत सॅनिटाईझर देणार

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोरोना व्हायरसचे संकट दिवसेंदिवस गडद होत असतांना ऊस उत्पादक सभासदांचे हित लक्षात घेऊन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने सर्व सभासदांना प्रति घरटी एक लिटर हँडसॅनिटायझर मोफत देण्याचा निर्णय कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी घेतला आहे अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीश जगताप यांनी दिली आहे.

कोरोना विषाणूचा प्रतिबंध रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांना वारंवार हँडसॅनिटायझर व साबणाने हात धुण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. त्यामुळे बाजारात हँडसॅनिटायझरची टंचाई निर्माण झाली होती. केंद्र व राज्य शासनाने राज्यातील आसवनी विभागांना हँडसॅनिटायझर निर्मितीचे आवाहन केले होते या आवाहनाला लोकप्रतिनिधी या नात्याने हँडसॅनिटायझरची टंचाई दूर करण्यासाठी अन्न, औषध विभागाकडून सर्व परवानग्या मिळवून कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या आसवनी विभागात हँडसॅनिटायझरचे उत्पादन सुरु केले आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे हि बाब चिंताजनक आहे.

त्यामुळे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांना प्रति एक लिटर हँडसॅनिटायझर घरपोहोच मोफत देण्याचा अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे.नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाण्याच्या माध्यमातूनआ.आशुतोष काळे ठिकाणी सात कोरोना विषाणू निर्जंतुकीकरन कक्ष देखील उभारले आहेत. आ. आशुतोष काळे यांनी सभासदांना मोफत हँडसॅनिटायझर देवून मोठा दिलासा दिला असून या निर्णयाचे सभासदांनी स्वागत केले आहे. ज्या सभासदांना मोफत एक लिटर हँडसॅनिटायझर वगळून वाढीव हँडसॅनिटायझर आवश्यक असेल अशा सभासदांना पाच लिटर मध्ये हे हँडसॅनिटायझर सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचा निर्णय आ. आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने घेतला असल्याचे कार्यकारी संचालक गिरीश जगताप यांनी सांगितले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close