कोपरगाव तालुका
कोपरगावात ..त्या सहा जणांचे अहवालही प्राप्त !

संपादक-नानासाहेब जवरे
कोपरंगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर येथील एका साठ वर्षीय महिलेला कोरोना विषाणूची लागण आढळल्या नंतर त्या भागातील या रुग्णांशी संबंधित जवळपास अठरा जणांना आरोग्य विभागाने आपल्या ताब्यात घेऊन त्यांना तपासणीसाठी नगर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले होते व त्यांच्या स्रावांचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठवले होते त्यातील चौदा जणांचे अहवाल काल प्राप्त झाले होते आज उर्वरित सहा जणांचे अहवाल आज प्राप्त झाले असून ते नकारात्मक आल्याने प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे.
लक्ष्मीनगर येथील रुग्ण महिलेच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील सहा जण व त्या कुटुंबाच्या संलग्न मित्र,रिक्षाचालक,त्याची पत्नी,त्याचा लहान नऊ महिन्याचा मुलगा,दूधवाला व एक फायनान्सवाला असे जवळपास अठरा जण दोन दिवसात ताब्यात घेतले होते व त्यांची रवानगी नगर येथे ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली होती.त्याचे स्राव रात्रीच तपासणीसाठी घेऊन तो पुण्यास रवानगी केली होती.त्यांचे चौदा अहवाल काल प्राप्त झाले होते तर उर्वरित सहा प्रलंबित होते ते आज प्राप्त झाले असून ते नकारात्मक आले आहेत-प्रशांत सरोदे मुख्याधिकारी, कोपरगाव नगरपालिका
कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर या उपनगरात एक साठ वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळल्याने तालुका प्रशासन आता खडबडून जागे होते त्यांनी त्या रात्रीच लक्ष्मीनगर व संलग्न साईनगर व धारणगाव रस्त्यानजीकचा परिसर सील केला होता. या रुग्ण महिलेच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील सहा जण व त्या कुटुंबाच्या संलग्न मित्र,रिक्षाचालक,त्याची पत्नी,त्याचा लहान नऊ महिन्याचा मुलगा,दूधवाला व एक फायनान्सवाला असे जवळपास अठरा जण रात्रीसह चोवीस तासात ताब्यात घेतले होते व त्यांची रवानगी नगर येथे ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली होती.त्याचे स्राव तपासणीसाठी घेऊन तो पुण्यास रवानगी केली होती.त्यांतील चौदा जणांचे अहवाल रविवारी प्राप्त झाले असून उर्वरित सहा जणांचे अहवाल व उशिराने आज प्राप्त झाले आहेत.आता पहिले रुग्ण वगळता अठरा जणांचे अहवाल नकारात्मक आल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांसह नागरिकांनी सुटकेचा श्वास टाकला आहे.त्यातील एका रुग्णास आत्मा मलिक हॉस्पिटल येथे देखभालीत ठेवले होते.आज देखभालीत ठेवण्यासाठी यातील चौदा जण हॉटेल स्पॅन येथे देखरेखीखाली ठेवण्यात आले असल्याची ताजी माहिती नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील नागरिकांनी सुटकेचा श्वास टाकला आहे. आता एक वृद्धा सोडली तर त्यानंतर एकही रुग्ण कोरोना बाधित नाही.हा कोपरगावकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.