जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

..बाजार समितीची शेतमाल खरेदी-विक्री बंद !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात कोरोना विषाणूंचा रुग्ण आढळून आल्याने व शहरात जमावबंदी आदेश जिल्हाधिकाऱ्यानी लागू केल्याने सावधगिरीचा उपाय म्हणून कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने आपले व्यवहार पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवला असल्याची माहिती दिली आहे.त्यामुळे कोपरगाव तालुका व आजूबाजूच्या परिसरातील शेतकाऱ्यांनी पुढील सूचना मिळेपर्यंत आपले शेतमाल कोपरगाव बाजार समितीत अनु नये असे आवाहन बाजार समितीचे सभापती संभाजीराव रक्ताटे यांनी केले आहे.

कोपरगावही कोरोनाचा एक रुग्ण आढळल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून कोपरगाव शहर व तालुका संपूर्ण टाळेबंदी खाली आणण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे बाजार समितीशी संबंधित सर्व शेतकरी, व्यापारी, हमाल-मापाडी व इतर बाजार घटक यांनी दिनांक १० एप्रिल रोजी पासून सर्व व्यवहार बंद ठेवले असल्याने कोणीही आपला भुसार माल, कांदा,भाजीपाला व तत्सम शेतमाल बाजार समितीत आणू नये-संभाजीराव रक्ताटे,सभापती कोपरगाव बाजार समिती.

भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ८ हजार ७३० इतकी झाली असून २९३ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर १३४ ने वाढ होऊन ती संख्या १ हजार ८९५ वर पोहचली आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.कोपरगावही कोरोनाचा एक रुग्ण आढळल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून कोपरगाव शहर व तालुका संपूर्ण टाळेबंदी खाली आणण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे बाजार समितीशी संबंधित सर्व शेतकरी, व्यापारी, हमाल-मापाडी व इतर बाजार घटक यांनी दिनांक १० एप्रिल रोजी पासून सर्व व्यवहार बंद ठेवले असल्याने कोणीही आपला भुसार माल, कांदा,भाजीपाला व तत्सम शेतमाल बाजार समितीत आणू नये असे आवाहन बाजार समितीचे सचिव परशराम शिनगर यांनी शेवटी केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close