कोपरगाव तालुका
…आरोग्य अधिकाऱ्यांनीं बनवले “हातधुणी” उपकरण !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
देशात कोरोनाच्या साथीने कहर केल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण तयार झाले असून नागरिकांना वाचविण्यात अहंम भूमिका निभावणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जिविताची काळजी हि बाबही अतिशय महत्वाची समजून कोपरगाव नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांच्या हात धुण्याची व्यवस्था करण्यासाठी स्वतः एक हातधुनी (हॅन्ड वाश) यंत्र तयार केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
आरोग्य विभागाचे कर्मचारी रात्रीचा दिवस करून या नागरिकांचे या साथीपासून संरक्षण करीत आहेत.त्यांच्याही आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यांच्या आरोग्याची काळजी हा हि तेवढाच महत्वाचा प्रश्न समजून कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी या कर्मचाऱ्यांचे वारवांवर हात धुण्यासाठी व या साथीपासून संरक्षण करण्यासाठी एक यंत्र तयार केले आहे.
भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ८ हजार ७३० इतकी झाली असून २९३ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर १३४ ने वाढ होऊन ती संख्या १ हजार ८९५ वर पोहचली आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.आरोग्य विभागाचे कर्मचारी रात्रीचा दिवस करून या नागरिकांचे या साथीपासून संरक्षण करीत आहेत.त्यांच्याही आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यांच्या आरोग्याची काळजी हा हि तेवढाच महत्वाचा प्रश्न समजून कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी या कर्मचाऱ्यांचे वारवांवर हात धुण्यासाठी व या साथीपासून संरक्षण करण्यासाठी एक यंत्र तयार केले आहे. सदर उपकरण हे हात न लावता पायाने वापर करण्याची सुविधा आहे.हात स्वच्छ करण्यासाठी रासायनिक द्रव हातावर घ्यायचे व पायाने पाण्याचा नळ सुरू करून २० सेकंद स्वच्छ हात धुवायचे आहे.या यंत्राचा वापर करून आरोग्य कर्मचाऱ्यांना आपले या कोरोनापासून संरक्षण करणे सोपे जाणार आहे.यासाठी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे, बांधकाम अभियंता डिगंबर वाघ,लेखापाल तुषार नालकर, विद्युत अभियंता रोहित सोनवणे,संगणक अभियंता भालचंद्र उंबरजे,चंद्रकांत साठे,राजेंद्र गाढे,पाणीपुरवठा अभियंता ज्ञानेश्वर चाकणे,नारायण साबळे,राकेश आहिरे, स्वच्छता निरीक्षक सुनील आरणे, तांत्रिक तज्ञ महारुद्र गालट आदींनी मेहनत घेतली आहे.
या कामगिरी बद्दल कोपरगाव पालिकेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे, उपाध्यक्ष योगेश बागुल, आरोग्य सभापती अनिल आव्हाड यांच्या सह सर्व गट नेते व पदाधिकारी यांनी कौतुक करून अभिनंदन केले आहे.