जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

..या बाजार समितीत लिलावस्थळी जमावबंदीचा फज्जा !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरेकोपरगाव-(प्रतिनिधी)राज्यात कोरोना या विषाणूच्या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासनाने जमावबंदी करण्यास मज्जाव केलेला असतानाही कोपरगाव बाजार समितीत भाजीपाला लिलाव करण्याच्या स्थळी कोपरगाव बैल बाजारात शेतकरी व भाजीपाला व्यापारी यांनी शासन आदेशाच्या जमाव बंदीचा फज्जा उडवलेला आढळून आला आहे.त्यामुळे शहरात नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान आठवड्यातील तीन दिवस भाजीपाला खरेदीसाठी हे जास्त होत असून कोरोनाचा प्रसार करण्यास निमित्त होऊ शकतो त्या ऐवजी आठवड्यातील केवळ एकच दिवस द्यावा व तो सकाळी आठ ते बारा वाजे पर्यंत असावा अशी आग्रहाची मागणी कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी पुन्हा एकदा आमच्या प्रतिनिधीकडे एका प्रसिद्धीपत्रकान्वये केली आहे.

भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ६ हजार ८२५ इतकी झाली असून २२९ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर १६२ ने वाढ होऊन ती संख्या १ हजार ३६४ वर पोहचली आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.तरीही खेड्यापाड्यात अद्यापही या साथीबाबत नागरिकांत जागरूकता आढळत नाही विशेषतः कोपरगाव शहरात याचे पालन होत नसल्याचे दिसणे हे दुर्दैव आहे.पोलीस प्रशासन व आरोग्य विभाग जनतेला जागे करण्यासाठी आपले प्राण पणाला लावत असताना नागरिकांना याचे भान नसल्याबाबत संताप व्यक्त होत आहे.सरकारने नागरिकांनी आपल्या आवश्यक गरजा भागविण्यासाठी किमान एक मिटरचे सामाजिक अंतर पाळावे हि तशी साधी बाब मात्र तेही काही बेजाबदर नागरिकांकडून पालन होत नाही.पर्यायाने अन्य नागरिकांच्या मृत्यूलाच हि मंडळी आमंत्रण देत आहे.

दरम्यान या ठिकाणी शेतकरी व व्यापारीच पूर्वी भाजीपाला खरेदीस येत होते मात्र तालुक्यात २४ मार्च पासून टाळेबंदी जाहीर झाल्या पासून यात अनेकांचे व्यवसाय बंद झाल्याने अनेकांचा रोजगार हिरावला गेला आहे.परिणामस्वरूप आता भंगारवाले,चहाचे टपरीवाले,हातगाडीवाले, व तत्सम अनेकजण या भाजीपाला व्यापारात उतरल्याने व्यापारी जास्त व खरेदीदार कमी अशी न भूतो अशी स्थिती निर्माण झाली आहे.

या बाबत कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे,कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी वारंवार आवाहन करूनही काही शेतकरी व व्यापारी दाद देत नसतील तर यांच्यावर कारवाईचा केली जावी अशी मागणी अन्य नागरिकांमधून आता होऊ लागली आहे.कोपरगाव बाजार समितीच्या बैल बाजार या ठिकाणी आठवड्यातील तीन दिवस भाजीपाला लिलाव करण्यास तालुका व शहर प्रशासनाने परवानगी दिली आहे.मात्र सामाजिक अंतर पाळण्याच्या अटीवर.मात्र त्या अटीलाच हरताळ फसण्याचे काम या ठिकाणी खरेदी व विक्रीस येणाऱ्या शेतकऱ्यांनी हाती घेतल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.यावर पोलिसानी कठोर कारवाई करण्याची मागणी कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष मंगेश पाटील यांनी केली आहे.व बाजारात येणाऱ्या शेतकरी व व्यापाऱ्यांनी येताना तोंडाला मास्क लावून येण्याची मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close