जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

…साई गाव पालखी बरोबरच या सहा संस्थांमार्फत मोफत भोजन

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरात आपल्या हातावर पोट असलेल्या कष्टकरी व आर्थिक दुर्बल गटातील नागरिकांना आपले सामाजिक दायित्व समजून त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात कोपरगावातील श्री साईबाबा गाव पालखी,समता चॅरिटेबल ट्रस्ट, गुरुद्वारा कोपरगाव,मुंबादेवी साईभक्त मंडळ,जय जलराम भक्त मंडळ,कोपरगाव माध्यमिक फौंडेशन,व मावळा ग्रुप आदी सात सेवाभावी संस्थांनी आपले दायित्व या कठीण समयी दाखवून खऱ्या अर्थाने आपले सामाजिक दायित्व जपल्याने या संस्थांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या बाबत आमच्या प्रतिनिधीने श्री साईगाव पालखीचे सदस्य संतोष चव्हाण यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी आपण साधारण तीस ते पस्तीस स्वयंसेवी कार्यकर्त्यांच्या सहाय्याने शहरात दररोज १६०० ते १६५० गरजू नागरिकांना जेवणाचे डबे पूरवित असून त्यात एक भाजी,चपाती व मसाला भात असा मेनू असतो.आधी या नागरिकांची नोंद करून त्याची खातरजमा करून आपल्या दुचाकी वाहनाद्वारे ते डबे नागरिकांना पुरावले जात असल्याचे सांगितले आहे.हा मेनू नरहरी विठ्ठल मंदिरातील कार्यालयात तयार करून सकाळी दोन व सायंकाळी दोन तास हे काम सामाजिक अंतर व सुरक्षेचे सर्व नियमांचे पालन करत वितरित केला जात आहे.त्यासाठी अनेक दानशूर नागरिकांनी मदत दिली आहे व आमची संस्था त्यात योगदान देत आहे- साईगाव सोहळा पालखी,मुंबादेवी मित्र मंडळ कोपरगाव.

हिंदू धर्मात अन्नदानाचे महत्व नेहमीच अधिक मानण्यात आले आहे. विशेषतः तीर्थक्षेत्री अन्नदान केल्याने महत्पुण्य लाभते अशी भावना आहे. या भावनेने प्रेरित होऊन काही दयाळू श्रीमंत लोकांनी तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी अन्नछत्रे उघडण्याची व ती व्यवस्थित चालविण्याकरिता कायम स्वरूपाची आर्थिक व्यवस्था ठेवण्याची जुनी प्रथा आहे.अशी अन्नछत्रे काही ठिकाणी आजही अस्तित्वात आहेत.अलीकडे धार्मिक वृत्ती कमी झाल्यामुळे अन्नछत्रे कमी होत आहेत.परंतु भूकंप,महापूर किंवा परचक्र यांमुळे झालेल्या आपद्ग्रस्त व निर्वासित यांच्याकरिता सरकार अगर इतर संस्थांमार्फत अन्नछत्रे आजही उघडली जातात अन्नछत्रांचा उपयोग विद्यार्थी, गोरगरीब, संन्यासी, साधू, यात्रेकरू, निराश्रित व इतर गरजू लोकांना नेहमीच होत आला आहे. या दृष्टीने अन्नछत्राची उपयुक्तता भारतात निर्विवाद मान्य केली जाते विशेषतः साथीचे रोग भूकंप,महापूर आदी काळात तर त्याला तोड नाही.देशात अध्या असेच अस्मानी संकट चीनच्या एका चुकीमुळे संपूर्ण जगभर थैमान घालत आहे.या विषाणूमुळे भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ६ हजार ८२५ इतकी झाली असून २२९ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर १६२ ने वाढ होऊन ती संख्या १ हजार ३६४ वर पोहचली आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

केंद्र सरकारने रविवार २२ मार्च रोजी पहिली टाळेबंदीची घोषणा करून दि.२४ मार्च पासून दि.१४ एप्रिल पर्यंत २१ दिवसाची टाळेबंदी जाहीर करून देशातील नागरिकांना आहे त्या ठिकाणी थांबण्यास सांगितले होते.व सर्व व्यवहार थांबवले होते.त्यामुळे अनेक शहरे व गावे जागच्या जागी थांबली यात अर्वाधिक नुकसान आर्थिक दुर्बल घटकांचे जे रोजंदारीवर आपला उदरनिर्वाह करतात त्यांच्यावर प्रतिकूल परिणाम झाला आहे.त्यांना आपली रोजी रोटी मिळविण्याची साधने हिसकावली गेली आहेत.शिवाय जेवणाची साधने हॉटेल,ढाबे बंद झाल्याने आपल्या पोटाची खळगी भरणे अवघड बनले.महानगरे, शहरे आदी ठिकानी थांबलेल्या या आर्थिक दुर्बल घटकांचे आपल्या रोजी रोटीचे खूप हाल झाले आहे.त्यांच्या हातातोंडाची गाठ पडणे अवघड झाले असताना सामाजिक संस्थानी यात मोठा पुढाकार घेतल्याने त्यांना हायसे वाटले असल्यास नवल नाही.कोपरगाव शहरही त्याला अपवाद नाही. त्यात श्री साईबाबा गाव पालखी,समता चॅरिटेबल ट्रस्ट, गुरुद्वारा कोपरगाव,मुंबादेवी साईभक्त मंडळ,जय जलराम भक्त मंडळ,कोपरगाव माध्यमिक फौंडेशन,व मावळा ग्रुप आदी सात सेवाभावी संस्थांनी आपले दायित्व या कठीण समयी दाखवून खऱ्या अर्थाने आपले सामाजिक दायित्व जपल्याने या नागरिकांना आपले जीवन जगण्यास मोठी मदत मिळाली आहे.यात सर्वाधिक मोठे काम श्री साईबाबा गाव पालखी,समता ट्रस्ट,गुरुद्वारा मंडळ,यांनी निभावली असली तरी त्यात जय जलराम भक्त मंडळ,मुंबादेवी भक्त मंडळ,कोपरंगाव माध्यमिक मित्र फाऊंडेशन,मावळा ग्रुप आदींचे कार्यही या कठीण प्रसंगी कमी नाही.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close