कोपरगाव तालुका
..या तारखेला गोदावरी कालव्याचे आवर्तन सुटणार
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोरोना विषाणूच्या जीवन मृत्यूच्या लढाईत गोदावरी कालव्यांच्या अवर्तनाकडे कोणाचेही लक्ष नव्हते.मात्र शेतकऱ्यांच्या फळबागा व उन्हाळी पिकांना मात्र त्याचा फटका बसत होता.त्याबाबत अनेक शेतकऱ्यांनी कोपरगावचे आ. आशुतोष काळे यांचे याकडे लक्ष वेधून घेतले होते.त्यांनी जलसंपदाच्या गोदावरी कालवा विभागाचे नाशिक येथील कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांचे लक्ष वेधून घेतले होते.त्यातून हि कार्यवाही झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ६ हजार ८२५ इतकी झाली असून २२९ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर १६२ ने वाढ होऊन ती संख्या १ हजार ३६४ वर पोहचली आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.त्यामुळे या जीवन मृत्यूच्या लढाईत गोदावरी कालव्यांच्या अवर्तनाकडे कोणाचेही लक्ष नव्हते.मात्र शेतकऱ्यांच्या फळबागा व उन्हाळी पिकांना मात्र त्याचा फटका बसत होता.त्याबाबत अनेक शेतकऱ्यांनी कोपरगावचे आ. आशुतोष काळे यांचे याकडे लक्ष वेधून घेतले होते.त्यांनी जलसंपदाच्या गोदावरी कालवा विभागाचे नाशिक येथील कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांचे लक्ष वेधून घेतले होते.पावसाळा अवघा दीड महिन्यावर आला असताना व पाणी धरणात पुरेसे शिल्लक असतानाही ते सोडले जात नव्हते याकडे त्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानुसार शनिवार दिनांक १२ पासून दारणा व गंगापूर समूहातील धरणांमधून नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यात उन्हाळी आवर्तन सोडण्यात येणार आहे.व दिनांक १५ एप्रिल पासून नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातुन गोदावरी डाव्या-उजव्या कालव्यांना आवर्तन सोडण्यात येणार आहे. त्या वेळी जलसंपदाने दिलेल्या सूचनांचे पालन करून पाटबंधारे विभागाला सहकार्य करून आवर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आ.काळे यांनी केले आहे.