कोपरगाव तालुका
…या ग्रामपंचायतीने दिव्यांगांना वस्तूंचे केले वाटप
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील चासनळी ग्रामपंचायत हद्दीत ग्रामपंचायतीने स्वनिधीतून पाच टक्के रक्कम खर्च करून आपल्या कार्यक्षेत्रातील दिव्यांगांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे.ग्रामपंचायतीचे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सरकारने नागरिकांनी आपल्या आवश्यक गरजा भागविण्यासाठी किमान एक मिटरचे सामाजिक अंतर पाळावे असे आवाहन केले आहे.मात्र त्याबाबत उदासीनता दिसत असून नागरिकांना टाळेबंदीमुळे आपल्या जीवनावश्यक गरजा भागवणे अवघड जात आहे.हि बाब ओळखून कोपरगाव तालुक्यातील चासनळी ग्रामपंचायतीने आपल्या हद्दीतील दिव्यांग नागरिकांना आपले जीवन सुसह्य व्हावे या साठी आपल्या पाच टक्के निधीतून या दिव्यांगांना जीवनावश्यक वस्तू देण्याचा निर्णय घेतला आहे.व त्याचे नुकतेच वाटप करण्यात आले आहे.
भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ६ हजार ८२५ इतकी झाली असून २२९ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर १६२ ने वाढ होऊन ती संख्या १ हजार ३६४ वर पोहचली आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.तरीही खेड्यापाड्यात अद्यापही या साथीबाबत नागरिकांत जागरूकता आढळत नाही हे दुर्दैव आहे.तर दुसरीकडे पोलीस प्रशासन व आरोग्य विभाग जनतेला जागे करण्यासाठी आपले प्राण पणाला लावत आसताना नागरिकांना याचे भान नसल्याबाबत संताप व्यक्त होत आहे.सरकारने नागरिकांनी आपल्या आवश्यक गरजा भागविण्यासाठी किमान एक मिटरचे सामाजिक अंतर पाळावे असे आवाहन केले आहे.मात्र त्याबाबत उदासीनता दिसत असून नागरिकांना टाळेबंदीमुळे आपल्या जीवनावश्यक गरजा भागवणे अवघड जात आहे.हि बाब ओळखून कोपरगाव तालुक्यातील चासनळी ग्रामपंचायतीने आपल्या हद्दीतील दिव्यांग नागरिकांना आपले जीवन सुसह्य व्हावे या साठी आपल्या पाच टक्के निधीतून या दिव्यांगांना जीवनावश्यक वस्तू देण्याचा निर्णय घेतला आहे.व त्याचे नुकतेच वाटप करण्यात आले आहे.
त्यावेळी सरपंच नीलकंठ चांदगुडे,उपसरपंच मनोज गाडे,ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब भारती, सुनील सुरभैय्या,विष्णू चांदगुडे,ग्रामविकास अधिकारी संतोष सोनवणे व ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामस्थ बहुसंख्येने हजर होते.ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.