नगर जिल्हा
…म्हणून या ग्रामस्थांनी केले गाव बंद !
संपादक-नानासाहेब जवरे
वारी-(प्रतिनिधी)
संपूर्ण जगभरात धुमाकुळ घालणाऱ्या कोविड १९ म्हणजेच कोरोना वायरस वारी शिवावर दाखल झाला आहे. वारी शेजारीच असणाऱ्या शिंगवे गावात दिल्लीस जमातमध्ये जावून आलेला एक कोरोना संशयीत रुग्ण आल्याचे ग्रामस्थांना समजल्यावरून व उपचार्थ हा रुग्ण वारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी आला असल्याची माहिती या भागात पसरल्याने ग्रामस्थात भीतीचे वातावरण पसरले आहे.हा रुग्ण वारी,शिंगवे या दोन्हीही गावात कोणत्या व्यक्तीशी संपर्क आला ह्याची तातडीने चौकशी होणे गरजेचे आहे.असे म्हणून शिंगवे गावात सर्व रस्ते खोदून व काट्यांचे कुंपण घालून बंद करण्यात आले आहे. कोणत्या व्यक्तीस बाहेर जाणे बंद करण्यात आले आहे.तसेच बाहेरील व्यक्तीसही गावात येण्यास बंदी घालण्यात आली आहे.त्याला ग्रामसेवक रा.का.पवार यांनी दुजोरा दिला आहे.
या बाबत आमच्या प्रतिनिधीने शिंगवे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक रा.का.पवार यांचेशी भ्रमणध्वनिवरून संपर्क साधला असता त्यांनी रस्ता खोदला असल्याचे वृत्ताचे खंडन केले असून या गावात शिर्डी व अन्य ठिकाणावरून मोठ्या संख्येने ग्रामस्थ गावात येतात त्यामुळे संसर्गाच्या भीतीने या गावातील नागरिकांनी रस्त्यात लाकडे रोवून व काट्या टाकून मार्ग बंद केला असल्याच्या माहीतीस दुजोरा दिला आहे.
भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ६ हजार ८२५ इतकी झाली असून २२९ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर १६२ ने वाढ होऊन ती संख्या १ हजार ३६४ वर पोहचली आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.तरीही खेड्यापाड्यात अद्यापही या साथीबाबत नागरिकांत जागरूकता आढळत नाही हे दुर्दैव आहे.मात्र या बाबत राहाता तालुक्यातील शिंगवे गावातील ग्रामस्थ सजग असल्याचे आढळून आले आहे.राहाता तालुक्यात एक कोरोनाचा रुग्ण वाढल्याने प्रशासनाने ग्रामस्थांचे सुरक्षेसाठी कडक भूमिका घेतली आहे.त्यांच्या गावात प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी एक संशयित कोरोनाग्रस्त आल्याची माहिती समजल्यावरून ग्रामस्थांनी आपले गाव बंद करण्याचाच निर्णय घेतला असून गावात जाण्याच्या मार्गात लाकडे रोवून व मार्गात काट्या टाकून तो रोखून धरला आहे.