जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

..या गावात सात गोण्या गुटख्यासह गाडी जप्त !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्यात कोरोना विषाणूंचा एकीकडे कहर सुरु असताना दुसरीकडे अवैध धंदे पोलिसांची डोकेदुखी ठरत आहे.आज सकाळी कोपरगाव तालुका पोलीस आपली गस्त घालीत असताना त्यांना ब्राम्हणगाव ग्रामपंचायत हद्दीत एक मारुती ओमनी कार (क्रं.एम.एच.१५ के.८३११) हि सुमारे सात गोण्या गुटखा घेऊन कोपरगावकडून मनमाडकडे जाताना आढळल्याने पोलिसानी ती आपल्या ताब्यात घेतली आहे.मात्र अन्न व औषधी प्रशासनास येण्यास उशीर झाल्याने अद्याप त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही.दरम्यान यात पोलिसांनी एक लाख तीस हजारांचा ऐवज मात्र जप्त केला आहे.त्यामुळे अवैध व्यवसाय करणाऱ्या घटकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

महाराष्ट्र शासनाने ९ जानेवारी २०१८ रोजी एक कायदा आणून लहान मुलाच्या आरोग्यावर दुष्परिणाम करणाऱ्या घुटखा या घटकांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा अंतर्गत कलम ३१ नुसार बंदी आणलेली आहे.या पदार्थामुळे लहान मुलांचे आरोग्य लहान वयातच या व्यसनाने झाकोळून जात होते असे शासनाचे लक्षात आले होते.

भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ६ हजार २३७ इतकी झाली असून १८७ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर १६२ ने वाढ होऊन ती संख्या १ हजार २९७ वर पोहचली आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.तरीही खेड्यापाड्यात अद्यापही या साथीबाबत नागरिकांत जागरूकता आढळत नाही हे दुर्दैव आहे.पोलीस प्रशासन व आरोग्य विभाग जनतेला जागे करण्यासाठी आपले प्राण पणाला लावत असताना दुसरीकडे अवैध धंद्यावाल्यानी आपला व्यवसाय वाढीची हि संधी समजून अजून पोलिसांची डोकेदुखी वाढवली आहे.कोपरगाव तालुका पोलिसांची ब्राम्हणगाव परिसरात आपली गस्त चालू असताना त्यांना एक मारुती ओमनी संशयास्पद रीतीने कोपरगावकडून मनमाडकडे जाताना आढळल्याने कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी सचिन इंगळे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी तिला हटकले असता त्यात अवैध रीतीने सुमारे सात गोण्या इतका गुटखा आढळून आला आहे.त्यांनी या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांना व अन्न व औषधी प्रशासनास या बाबत कळवले असून पुढील कारवाई पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close