कोपरगाव तालुका
कोपरगावात या बँकेस झाला ५.६७ कोटींचा नफा

संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
उत्तर महाराष्ट्रात सहकारी बँकेत अग्रणी असलेल्या कोपरंगाव येथील कोपरगाव पीपल्स को.ऑपरेटिव्ह बँकेच्या नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षाचा ताळेबंद जाहीर झाला असून यात बँकेने ५ कोटी ६७ लाखांचा नफा मिळवला आहे.बँकेच्या या यशाचे सभासदांसह सर्वत्र कौतुक होत आहे.
बँकेने सेवकांनी केलेल्या लक्षवेधी कामाची दखल घेऊन त्यांना संपलेल्या वित्तीय वर्षात २० टक्के बोनस एक महिन्याचा अतिरिक्त लाभ,पंधरा दिवसाचे बक्षीस देण्यास मंजुरी दिली आहे.बँकेस लेखापरिक्षांत ‘अ’ वर्ग प्राप्त केलेला असून हि यशाची कमान अशीच चढती राहील असा विश्वास आहे.-अध्यक्ष अतुल काले
राज्यात व देशात कोरोना विषाणूने कहर उडवून दिला आहे.त्यामुळे सरकारसह नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.बाजारपेठा ठप्प झालेल्या आहेत.तरीही नुकत्याच संपलेल्या वर्षात बँकेने २६६ कोटी ४६ लाख रुपयांच्या ठेवी मिळवल्या असून यातून कर्ज दारांना १२४ कोटी ९४ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे.या बँकेचे भागभांडवल ५ कोटी ४८ लाख असून निधी २९ कोटी ७९ लाख आहे.तर गुंतवणूक १६२ कोटी १३ लाख इतकी करण्यात आली आहे.बँकेचा ढोबळ नफा ५ कोटी ६७ लाख इतका झाला आहे.सर्व तरतुदी वजा जाता बँकेला निव्वळ नफा २ कोटी ८७ लाख राहिला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष अतुल काले यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
या यशात संस्थेचे जेष्ठ संचालक रतनचंद ठोळे,कैलास ठोळे, डॉ.विजयकुमार कोठारी,सुनील कंगले, रवींद्र लोहाडे, धरमकुमार बागरेचा, कल्पेश शहा उपाध्यक्षा प्रतिभा शिलेदार सर्व संचालक,व्यवस्थापक दीपक एकबोटे,अधिकारी,कर्मचारी यांचे योगदान असल्याचे गौरवोद्गार अध्यक्ष अतुल काले यांनी काढले आहेत.