जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात चौघांचे जमावबंदीचे उल्लंघन,तर तरुण गजाआड

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगावसह राज्यात शासनाने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी आदेश लागू केलेला असतानाही काही नागरिकांनी त्याचे उल्लंघन केल्याने आज दिवसभरात कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी एक माहिलेसह चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे बेशिस्त नागरिकांत खळबळ उडाली आहे.

कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे,कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी वारंवार आवाहन करूनही काही ग्रामस्थ दाद देत नसतील तर यांच्यावर कारवाईचा केली जावी अशी मागणी अन्य नागरिकांमधून आता होऊ लागली आहे.याचाच अनुभव काल शहर पोलिसांना आला असून एक महिलेसह चौघांवर कारवाई करण्याचा पोलिसांना प्रसंग आला आहे.

भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ६ हजार २३७ इतकी झाली असून १८७ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर १६२ ने वाढ होऊन ती संख्या १ हजार २९७ वर पोहचली आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.तरीही शहरासह खेड्यापाड्यात अद्यापही या साथीबाबत नागरिकांत जागरूकता आढळत नाही हे दुर्दैव आहे.पोलीस प्रशासन व आरोग्य विभाग जनतेला जागे करण्यासाठी आपले प्राण पणाला लावत आसताना नागरिकांना याचे भान नसल्याबाबत संताप व्यक्त होत आहे.सरकारने नागरिकांनी आपल्या आवश्यक गरजा भागविण्यासाठी किमान एक मिटरचे सामाजिक अंतर पाळावे हि तशी साधी बाब मात्र तेही काही बेजाबदार नागरिकांकडून पालन होत नाही.पर्यायाने स्वातंसह अन्य नागरिकांच्या मृत्यूलाच हि मंडळी स्वतःहून आमंत्रण देत आहे.या बाबत कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे,कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी वारंवार आवाहन करूनही काही ग्रामस्थ दाद देत नसतील तर यांच्यावर कारवाईचा केली जावी अशी मागणी अन्य नागरिकांमधून आता होऊ लागली आहे.याचाच अनुभव काल शहर पोलिसांना आला असून एक महिलेसह चौघांवर कारवाई करण्याचा पोलिसांना प्रसंग आला आहे.त्यात आरोपी प्रतीक कैलास मोरे,वैशाली कैलास मोरे दोघे रा.मळेगाव थडी, तर दुसऱ्या गुन्ह्यात शानुल लक्ष्मण पवार,रा.बालाजीअंगण सोसायटी कोपरगाव,तर तिसऱ्या गुन्ह्यात विशाल रतन मोरे, रा.वेळापूर.आदींचा समावेश आहे.

दरम्यान आज दुपारी कोपरगाव शहरातील खुले नाट्यगृहाशेजारी राहणाऱ्या एका तरुणाने आपल्या सामाजिक संकेत स्थळाच्या आपल्या डी.पी.मध्ये नुकत्याच दिल्लीत तबलीगी जमातीच्या वादग्रस्त झालेल्या धार्मिक कार्यक्रमाच्या कृती पृष्टर्थ काही आक्षेपार्ह टिपणी केल्याने मोठा गोंधळ उडाल्याने त्याची दखल कोपरगावचे तहसीलदार व शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी गंभीरपणे घेऊन या तरुणास कायद्याचा हिसका दाखवल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यामुळे सामाजिक संकेतस्थळावर आक्षेपार्ह टिपण्या करणाऱ्या तरुणांच्या मनात चांगलीच जरब बसली आहे.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसानी भा.द.वि.कलम १८८(२),२६९,२७१,२८३,महाराष्ट्र कोव्हिड-१९ उपाययोजना २०२० चे कलम ११ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मान गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.तिकोणे,पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close