कोपरगाव तालुका
कोपरगावात महिलेचा विनयभंग,या आरोपीवर गुन्हा दाखल
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील टाकळी नाका परिसरातील एका सत्तावीस वर्षीय महिलेचा नजीकच्या आरोपी लतेश शाम ननावरे याने रविवार दि.५ एप्रिल ते मंगळवार दि.७ एप्रिल रोजी हात धरून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याने या आरोपी विरुद्ध या महिलेने विनयभंगाचा व जीवे मारण्याचा गुन्हा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्याने टाकळी नाका परिसरात खळबळ उडाली आहे.
रविवार दि.५ एप्रिल रोजी आरोपी हा या महिलेचा पती घरी नसताना आला व त्याने पतीची विचारणा करून ते कुठे गेले आहे.असे विचारले असता या महिलेने ते बाहेर गेले असल्याचे सांगितले त्यावेळी आरोपी लतेश ननावरे याने या महिलेला,”आपल्याला तुझ्याशी बोलायचे आहे” असे म्हणाला मात्र आपण त्यास नकार दिला असता त्याने आपला हात बळजबरीने धरून जवळ ओढून आपल्याला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आहे.आपण आरडा ओरडा केला असता आरोपी पळून गेला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी महिला व आरोपी लतेश ननावरे हे एकाच गल्लीतील रहिवाशी आहे.फिर्यादी महिला आपल्या पतीसह,सासू,सासरे,दोन मुले असे एकत्र राहतात.आरोपी हा फिर्यादी महिला व त्यांच्या कुटुंबीयांचा चांगला परिचयाचा आहे.रविवार दि.५ एप्रिल रोजी आरोपी हा या महिलेचा पती घरी नसताना आला व त्याने पतीची विचारणा करून ते कुठे गेले आहे.असे विचारले असता या महिलेने ते बाहेर गेले असल्याचे सांगितले त्यावेळी आरोपी लतेश ननावरे याने या महिलेला,”आपल्याला तुझ्याशी बोलायचे आहे” असे म्हणाला मात्र आपण त्यास नकार दिला असता त्याने आपला हात बळजबरीने धरून जवळ ओढून आपल्याला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आहे.आपण आरडा ओरडा केला असता आरोपी पळून गेला आहे.आपण आपले पती घरी आल्यावर झालेला प्रकार त्यांच्या लक्षात आणून दिले.त्यानंतर आपल्या पतीच्या भ्रमणध्वनीवर संपर्क करून त्यांच्या मनात आपल्याबद्दल गैरसमज होईल असे कृत्य करून आपले व आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचे खोटे सांगून त्याचे फोटो व व्हिडीओ आपण समाज माध्यमात टाकू अशी धमकी दिली.त्याबाबत त्या महिलेणे त्याला घरासमोरून जाताना जाब विचारला असता त्याने आपल्याला अश्लील शिवीगाळ करून पुन्हा आपल्याला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.मात्र आपण प्रथम समजात आपली बदनामी होईल अशा कारणाने पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली नव्हती असे फिर्यादी महिलेने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसानी गु.र.नं.१२८/२०२० भा.द.वि.कलम ३५४,५०४,५०६ प्रमाणे आरोपी लतेश ननावरे याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर याच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.रामदास पुंड हे करीत आहेत.