जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

वाकड़ीतील”..त्या” फलकाची जोरदार चर्चा !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(किरण शिंदे)

वाकड़ी येथील उपसरपंच निवड व एका सदस्याचा वाढदिवसाच्या निमित्ताने लावण्यात आलेल्या फलकवर दोनही वेळी दोन वेगवेगळ्या गटाच्या स्थानीक लोकांना डावलण्यात आल्याने वाकडी परिसरात हा फलक चर्चेचा विषय सध्या चर्चेचा बनला आहे.

राहाता तालुक्यात काय तर कोपरगाव मतदारसंघात विखे,काळे,कोल्हे हे एकत्र कधीही फलकवर दिसले नव्हते.एकमेकांच्या तक्रारी मुंबई पर्यंत करणारे नेते राहाता तालुक्यातील वाकड़ी गावच्या साध्या उपसरपंच निवडीवेळी एकत्र फलकवर दिसल्याने मतदार संघात सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या वेळी वापरून घेण्याचा व आपला स्वार्थ आला असता पुन्हा दुही निर्माण करण्याचाही कला या नेत्याना चांगलीच अवगत झाली आहे.

राहाता तालुक्यातील वाकड़ी ग्रामपंचायतच्या उपसरपंच यांनी राजीनामा दिल्याने बिनविरोध झालेल्या महिला उपसरपंच निवडीनंतर गावात मोठ्या उत्साहात सुभेच्छा फलक लावण्यात आले होते.मात्र या सुभेछ्या फलकवर विखे गटाचे सरपंच यांचा फ़ोटो डावलून एकमेकाचे राजकीय कट्टर विरोधक असलेले विखे,काळे,कोल्हे या आजी माजी आमदारांसह गावातील स्थानीक विरोधी नेते मंडळीचे फ़ोटो एकाच फलकावर झळकल्याने या फलकची जोरदार चर्चा वाकडी परिसरात सुरु झाली आहे.एका लोकप्रिय सदस्याच्या वाढदिवस निमित्त लावण्यात आलेल्या सुभेच्छा फलकावर मतदार संघातील सत्ताधारी लोकप्रतिनिधिचा फ़ोटो असताना त्यावर देखील त्या सत्ताधारी नेत्याच्या स्थानीक कार्यकर्ते यांचे फ़ोटो नसल्याने हा विषय सध्या चांगलाच चर्चेचा बनला आहे
सध्या या फलकची तालुक्यासह मतदारसंघात जोरदार चर्चा सुरु आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”दीड महीनापूर्वी राहाता तालुक्यातील वाकड़ी गावात पहिल्या निवडणुकीवेळी उपसरपंच झालेल्या सदस्य यांनी राजीनामा दिल्याने पुन्हा रिक्त झालेल्या उपसरपंच पदाची निवड झाली आहे.मात्र या उपसरपंच निवडी दरम्यान कोल्हे गटाचे सदस्य असलेल्या एका उमेदवाराने पदासाठी जोरदार व्यूहरचना केली असता त्यांना स्वगृही येण्यात अपयश आले.याच वेळी विखे गटाच्या जुन्या गटाची धाकधुक वाढली होती.रात्र-अपरात्री बैठक घेऊन राजकीय खेळी वापरून व काही अटी तटीवर काळे-कोल्हे गटाच्या प्रमुख कार्यकर्त्याना एकत्र आणून विखे गटाच्या जुन्या गटाच्या उपसरपंच निवडीचा मार्ग मोकळा करण्यात आला.वाकड़ी ग्रामपंचायत मधे विखे गट-(जनसेवा मंडळ)१०,कोल्हे गट-६ व काळे गट-१ असे १७ सदस्य असताना केवळ या अडीच वर्षापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमधे नव्याने तयार झालेल्या विखे गटाच्या भाऊसाहेब शेळके,डॉ.संपतराव शेळके,संदीपानंद लहारे,पोपट लहारे यांनी डॉ सुजय विखे पाटील युवा मंच स्थापन करुण मुठभर कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन प्रथम लोकनियुक्त सरपंच म्हणून जनतेने डॉ.संपतराव शेळके यांना निवडून देत सरपंच केले. असे असताना आजही काही राजकीय वरिष्ठ विरोधक अपयश पचविण्यास तयार नाही.विखे गटाच्या (जनसेवा मंडळ) उपसरपंचपदि महिला ग्रामपंचायत सदस्य निवड झाली असता गावामधे लावण्यात आलेल्या सुभेछ्या फलकामध्ये विखे-काळे-कोल्हे गट एकत्र झळकले आहे.हे मोठे आश्चर्य मानले जात आहे.
राहाता तालुक्यात काय तर कोपरगाव मतदारसंघात विखे,काळे,कोल्हे हे एकत्र कधीही फलकवर दिसले नव्हते.एकमेकांच्या तक्रारी मुंबई पर्यंत करणारे नेते राहाता तालुक्यातील वाकड़ी गावच्या साध्या उपसरपंच निवडीवेळी एकत्र फलकवर दिसल्याने मतदार संघात सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या वेळी वापरून घेण्याचा व आपला स्वार्थ आला असता पुन्हा दुही निर्माण करण्याचाही कला या नेत्याना चांगलीच अवगत झाली आहे.मात्र कार्यकर्ते व जनता मात्र त्यातून अद्याप आपल्या हिताचा योग्य तो बोध घ्यायला अद्याप तरी तयार असल्याचे दिसत नाही. त्यामुले उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close